अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

२८ जानेवारीची सकाळ एक दुःखद बातमी घेऊन आली. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील चमकता तारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले. त्याच्या सोबत सहा जणांचे ही या अपघातात निधन झाले.
महाराष्ट्राच्या प्रशासनावर गेली अनेक वर्षे हुकुमत गाजवणाऱ्या अजित पवारांच्या या दुःखद निधनाने संपूर्ण महाराष्ट्र दुःखाच्या सागरात डुंबून गेला आहे.
अजित पवार हे आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने बारामती जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या सहा सभांना संबोधित करणार होते. एका खाजगी विमानाने शरद पवार आज मुंबई येथून बारामती ला येत असताना त्यांचे विमान बारामती येथे लॅंड होत असतांनाच हा अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्या सोबत सहा जणांचा ही मृत्यू झाल्याची माहिती मिळते.
अजित पवारांच्या पत्नी सौ. खा. सुनेत्रा पवार, खा. सौ. सुप्रिया सुळे आणि खा. शरद पवार हे सर्वजण आज केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे दिल्ली येथेच होत्या. मात्र या अपघाताचे वृत्त समजताच ते तातडीने बारामती कडे निघाले आहेत.
अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच अपघातस्थळी त्यांच्या चाहत्यांनी व समर्थक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.
अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर भारतालाही हेलावून टाकणारे आहे. महाराष्ट्रातील एक कणखर नेता गमावल्याचे मोठे दुःख सर्वांना हेलावून टाकणारे आहे.

