महाराष्ट्र

नागेश जोंधळे इंटरनॅशनल प्राईम अवॉर्ड्स २०२२ पुरस्काराने सन्मानित

इंटरनॅशनल प्राईम अवर्ड्स २०२२ यंदा नाशिकच्या सांस्कृतिक भूमीत रविवारी उत्साहात पार पडला. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आपला ठसा उमटवत आपले स्थान अबाधीत राखणाऱ्या भारतभरातील मान्यवरांना गौरविण्यात आले. यावेळी आई सेंटरचे संस्थापक तथा विश्वविक्रमवीर नागेश जोंधळे यांना शिक्षण क्षेत्रातील ‘इंटरनॅशनल प्राईम अवॉर्डस-2022’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सारनाथ एज्युकेशन आणि ग्लोबल एज्युकेशन अँड मीडिया फाउंडेशन आयोजित या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून कोरेन लव्हजॉय (झिम्बाब्वे), सनासा बियडोम (साऊथ आफ्रिका), सृजनशील चित्रपट दिग्दर्शक निलेश आंबेडकर, सिनेअभिनेत्री शिल्पा पंडित, पोलीस उप निरीक्षक मिलिंद तेलोरे, आयपीए २०२२ चे मुख्य समन्वयक राहुल सोनावणे, पुरस्कार ज्यूरी सदस्य संजय भारतीय, सचिन धारणकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
हा भव्य पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ही करण्यात आले होते,


संपूर्ण भारतातून आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना शिक्षण, सामाजिक कार्य, आरोग्य, सिनेमा, नृत्य, साहित्य, बाल कलाकार अश्या अनेक श्रेणी मध्ये पुरस्कृत करण्यात आले. यावेळी ‘इन्फॉर्मेशन एक्सचेंज सेंटर अर्थात आई सेंटर’ चे लोकल ते ग्लोबल यशस्वीपणे नेतृत्व करणारे नागेश जोंधळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, अगदी तालुका पातळीवरून, जिल्हा, राज्य, देश तसेच विदेश येथील तरूण-तरूणी, अनुभवी तथा विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची टीम यामुळेच आमच्या ‘आई सेंटर चे मिशन – सशक्त राष्ट्र निर्मितीसाठी तरुणांना सक्षम बनविणे’ यासाठी शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवरील नवनवीन कौशल्य विकसित करण्यासाठी अविरतपणे काम करत असताना ‘इंटरनॅशनल प्राईम अवॉर्ड 2022’ संयोजकांनी दिल्याबद्दल नक्कीच आणखी संपूर्ण टीमचे मनोबल वाढवण्यास मदत होणार

असल्याचे सांगत सर्वांचे ऋण व्यक्त करत जर्मनीचे आई सेंटर ची संचालिका बेटीना, प्रा.राजेश मिश्रा (दिल्ली), आरती यादव, करम पाल सर व शिल्पा राव (हरयाणा), डॉ. ऍडम (हैदराबाद), रश्मी राव मॅडम, सोशल मिडिया मॅनेजर गौरव लखेरा, अंकित देवरानी व नवनीत उनियाल (उत्तराखंड), निशिता अजमेरा (अहमदाबाद), यांचे सह महाराष्ट्रातील आई सेंटरचे फ्रॅंचाईजी डायरेक्टर संदीप अंबेसंगे (पुणे), प्रेरणादायी वक्ते राहुल बनसोडे (नाशिक), प्रा. धम्मानंद सरवदे (लातूर) प्रा.रश्मी काकडे, इंजि. किशोर गवळे, (औरंगाबाद), प्रा. रफिक शेख, प्रा. अमर वाकळे (परभणी), प्रतिक गौतम, योगेश्वरी पुदाले (अंबाजोगाई) यांनी केलेल्या सांघिक कामगिरीचे विशेष कौतुक केले व अधिक उत्साहाने जागतिक पातळीवर आपल्या कामाचे अधिकाधिक ठसे उमटवण्यासाठी जबाबदारीने काम करण्याची सुवर्णसंधी असल्याचे सांगत सर्व आई सेंटर’चे मेन्टाॅर्स, फॅमिली मेंबर्स, मित्रपरिवार, शुभचिंतक यांचे आभार मानले.
यापूर्वीही नागेश जोंधळे यांच्या नेतृत्वात आई सेंटरला ‘आंतरराष्ट्रीय आयएसओ 9001:2015 मानांकन’तसेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड -2022 सह 5 विश्वविक्रम, शिक्षण क्षेत्रातील इंटरनॅशनल आयडॉल अवॉर्ड-2021, इंटरनॅशनल ऑनररी अवॉर्ड-2020 इत्यादी असे विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ऍमेझॉन वरील बेस्ट सेलिंग ठरलेले ‘द डायनॅमिक कम्युनिकेटर’ या पुस्तकाचे लेखक म्हणून नागेश जोंधळे यांनी ‘आई सेंटर’च्या माध्यमातून सर्व क्षेत्रातील तज्ज्ञांचा विश्वास संपादन करत आपल्या कार्यकर्तुत्वाचा आलेख पूर्ण विश्वभर उंचावत आहेत.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी जाधव व तिलोत्तमा बाविस्कर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षय जाधव, नीलिमा धारणकर, सीमा सुकटे, प्रवीण भोसले, अस्मिता सुकटे यांनी परिश्रम घेतले.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker