राष्ट्रीय

नव्या कोरोना व्हेरीयंट BF.7 बद्दल राज्य शासन सतर्क…!

चीन सह इतर काही देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा मोठ्याप्रमाणात वाढला असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आपल्या राज्यात कोरोना चाचणी, उपचार, लसीकरण तसेच कोरोना रूग्णांचा तपास हे पुन्हा एकदा सुरू करण्याच्या सुचना आरोग्य विभागास दिल्या असल्याचे सावंत यांनी सांगितले.

आयोजित पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले, राज्यात BF.7 ह्या नविन व्हेरिएंटचा अद्यापही एकही रूग्ण आढळून आला नाही मात्र शेजारील राज्यात चार सापडले आहेत, त्यामुळेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विमानतळ, राज्याच्या सीमारेषा, या भागातून येणारया व्यक्तींची थर्मल टेस्टींग तसेच इतर अत्यावश्यक चाचणी करून घेण्यात येणार आहेत, याबरोबरच त्या चाचणीत काही आढळून आले तर लगेचच विलगीकरण करण्यात येणार आहे तसेच सध्या तरी महाराष्ट्रर लॉकडाउन लागणार नसल्याची माहितीही त्यांनी दिली.

कोरोनाचे निर्बंध अद्याप कोठेही लावण्यात येणार नसून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील आवश्यक ते निर्णय घेण्यात येणार असल्याचे सावंत यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. त्याचबरोबर आज राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा संपूर्ण आढावा घेतला असून यंत्रणेस अलर्ट मोडवर राहाण्याच्या सुचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. सदरील कोरोना व्हायरंट हा अधिक घातक नसून नागरीकांना घाबरण्याचे कारण नाही असे ही त्यांनी सांगितले.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker