नवी दिल्ली येथील पुरस्कार वितरण कार्यक्रमास केंद्रीय मंत्री शेखावत यांच्या सह रसिक कुंकुलोळ यांची उपस्थिती


केंद्रीय जल शक्ती मंत्रालय व सरकार टेल डॉट कॉम या संस्थेच्या वतीने नवीदिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात केंद्रीय जल शक्ती मंत्रालयाचे मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या सह अंबाजोगाईचे भुमीपुत्र तथा पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक रसिक कुंकुलोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.


केंद्रीय जल शक्ती मंत्रालय व सरकार केलं डॉट कॉम घ्या वतीने नांदेड येथील जिल्हाधिकारी अभिजित राऊत व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उध्दव भोसले, कुलसचीव डॉ. सर्जेराव शिंदे यांना नवीदिल्ली येथील महाराष्ट्र सदनात नुकताच जलप्रहरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास अंबाजोगाई चे भुमीपुत्र रसिक कुंकुलोळ, ज्ञानोबा पाटील आणि सरकार केलं डॉट कॉम चे अमर साठ्ये यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होती.


जलशक्ती मंत्रालय व सरकार केलं डॉट कॉम यांच्या वतीने २९ मारृच रोजी जलसंवर्धन क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवर व्यक्ती व संस्थांचा “जलप्रहरी” या पुरस्काराने २९ एप्रिल रोजी वरील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास सुनील देवधर, मुंबई चे खा. गोपाल शेट्टी, खा. उमेश पाटील यांची विशेष उपस्थिती होती.