महाराष्ट्र

नवरात्र महोत्सव दोन दिवसांवर! काय आहे महत्व नवरात्रीत नवू रंगाचे!

भारतातील प्रमुख सणांपैकी नवरात्र हा एक मोठा सण/उत्सव आहे. पंचांगानुसार, यंदा 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्री सुरू होईल. 23 ऑक्टोबर रोजी या सणाचा अखेरचा दिवस. हे 9 दिवस देवीच्या विविध रूपांना अर्पण केले जातात. त्यामुळे या दिवसांत उपवास पाळला जातो, शिवाय 9 दिवस 9 रंगांचे वस्त्र परिधान करण्याची परंपरा आहे. तर शारदीय नवरात्रीच्या नवमी तिथी नंतर दसरा सण साजरा होतो.

धार्मिक ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार  आदिशक्तीला लाल रंग सर्वाधिक प्रिय असतो, मात्र तरीही 9 दिवस देवीची विविध रंगांचे कपडे परिधान करून पूजा करायला हवी. असं केल्यास दुर्गा मातेची अपरंपार कृपा भाविकांवर राहते. असे सांगितले आहे. त्यानुसार यावर्षीच्या नवरात्रोत्सवाच्या कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे, हे जाणून घेवून या…

1) 2023 प्रतिपदा तिथी (नारंगी) शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, 15 ऑक्टोबर रोजी घटस्थापनासोबत शैलपुत्री देवीची पूजा केली जाईल. देवीला केशरी रंग आवडतो. केशरी रंग ऊर्जा आणि आनंदाची भावना देतो. केशरी रंग सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतो.

2)  नवरात्री 2023 द्वितीया तिथी (पांढरा) 

16 ऑक्टोबर रोजी नवरात्रीचा दुसरा दिवस. ब्रह्मचारिणी देवीला समर्पित केला जाईल. हा दिवस  सोमवार आहे, त्यामुळे पांढरे वस्त्र परिधान केल्याने देवीसोबत भोलेनाथाचा आशीर्वाद प्राप्त होतो. सफेद हे पवित्रता आणि शांतीचे प्रतीक आहे, त्यामुळे आत्मविश्वास वाढतो.

3) नवरात्री 2023 तृतीया तिथी (लाल) 

17 ऑक्टोबर रोजी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाईल. या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ राहील. लाल रंग हा दुर्गेचा सर्वात आवडता रंग मानला जातो. लाल रंग शक्ती 

नवरात्री 2023 चतुर्थी तिथी (गडद निळा) 

4) 18 ऑक्टोबर हा नवरात्रीचा चौथा दिवस आहे. या दिवशी गडद निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून कुष्मांडा देवीची पूजा करा. असे मानले जाते की, हा रंग आनंदाची भावना देतो. यामुळे समृद्धी वाढते.

5) नवरात्री 2023 पंचमी तिथी (पिवळा) 19 ऑक्टोबरला पिवळा रंग परिधान करून देवी स्कंदमातेची पूजा करणे खूप शुभ राहील. पिवळा रंग धारण केल्याने पूजन केल्याने सौभाग्य वृध्दी होते.

6) नवरात्री 2023 षष्ठी तिथी (हिरवा)

20 ऑक्टोबर रोजी माता कात्यायनीची पूजा केली जाईल. या दिवशी भक्तांनी हिरवा रंग परिधान केल्याने प्रगतीचा मार्ग खुला होईल. हिरवा रंग निसर्ग, समृद्धी आणि विकासाचे प्रतीक आहे. यामुळे सुखी वैवाहिक जीवन आणि संतती वाढीचे आशीर्वाद मिळतात.

7) नवरात्री 2023 सप्तमी तिथी (राखाडी) 21 ऑक्टोबर रोजी देवी कालरात्रीच्या पूजेमध्ये राखाडी रंग परिधान करा. नवरात्रीमध्ये राखाडी रंगाची पूजा केल्याने दुष्टांचा नाश होतो.

8) नवरात्री 2023 अष्टमी तिथी (जांभळा)

22 ऑक्टोबर रोजी जांभळ्या रंगाचे कपडे परिधान करून देवी महागौरीची पूजा करा. नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख-समृद्धी प्राप्त होत.

9) नवरात्री 2023 नवमी तिथी (मोरपिसी) 

23 ऑक्टोबर रोजी महानवमीच्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाईल. या दिवशी मोरपिसी हिरव्या रंगाचा वापर करा. मोरपिसी हिरवा रंग विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो.

        नवरात्रोत्सवाच्या प्रतिपदेला काही घरांमध्ये घटस्थापना केली जाते, त्यासाठी विविध राज्यांमध्ये विविध परंपरा पाळल्या जातात. धार्मिक ग्रंथात  दिलेल्या माहितीनुसार, ज्या घरात घटस्थापना केली जाते, तिथे  9 दिवस लसूण, कांदा खाल्ला जात नाही. सतत नवू दिवस देवीची पुजा, पाठ व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करुन देवीची आराधना केली जाते. व दशमीच्या दिवशी सीमोल्लंघनाने या उत्सवाची सांगता होते.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker