महाराष्ट्र

नवनीत कॉवत नवे बीड जिल्हा पोलीस प्रमुख

बीड जिल्ह्याचे नवीन पोलीस प्रमुख म्हणून नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवीन कॉवत हे सध्या छत्रपती संभाजीनगर येथे उपायुक्त असुन त्यांची (beed sp) एसपी म्हणून ही पहिलीच नियुक्ती आहे. ते २०१७ च्या बॅचचे आयपीएस आहेत.
अविनाश बारगळ यांच्या बदलीची घोषणा काल सभागृहात करण्यात आली होती. त्यानंतर बीडला पोलीस अधिक्षक म्हणून कोण येणार याची सर्वांना उत्सुकता होती. या पदासाठी अनेक नावांची चर्चा असतानाच आता शासनाने नवनीत कावत यांची या पदावर नियुक्ती केली आहे. कावत मुळचे राजस्थानचे असुन २०१७ च्या बॅचचे आयपीएस आहेत. त्यांनी यापुर्वी धाराशिव येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे तर सध्या ते छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्त होते. एक शांत पण ठाम अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker