Uncategorizedमहाराष्ट्र

नवजिवन व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका अंजली पाटील सह इतर दोघांवर ऍट्रॉसिटी ऍक्ट सह इतर कलमान्वये गुन्हा दाखल

ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अंबाजोगाई -लातुर राज्यरस्त्यावरील वाघाळा येथे अस्तित्वात असलेल्या नवजिवन व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका सौ. अंजली पाटील यांच्यासह राजकुमार सोपान गवळे आणि ओम डोलारे यांच्या विरोधात अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमाती 3(1)(r), 3(1) (5), (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम ,1989 7 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जाती 3 (2) (va), अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989, भारतीय दंड संहिता 1860 कलम 354-A, 504, 506,34 या कलमान्वये 9 मार्च रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात डॉ. संध्या संभाजी वाघमारे वय 32, रा. आनंद निवास, या. केज जि. बीड यांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, मी सध्या संभाजी वाघमारे वय 32 वर्षे व्यवसाय डॉक्टर राहाणार अनंद निवास, फळ रोड केज ता. केज जि. बीड समक्ष पोस्टला हजर येवुन तोंडी सांगुन फिर्याद देते की, मी वरील ठिकाणची राहाणारी आसुन मी माझे आई नामे लता संभाजी वाघमारे, वडील नामे संभाजी ग्यानबा वाघमारे व भाऊ नामे बाबु संभाजी वाघमारे, लक्ष्मीकांत वाघमारे, अनंद सभाजी वाघमारे यांच्या साबत वरील ठिकाणी राहात आहे. दिनाक 22/02/2022 रोजी निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून मी नवजिवन व्यसनमुक्ती केंद्र वाघाळा ता. अंबाजोगाई येथे माझी नियुक्ती करण्यात आली होती.

एक्सपायर गोळ्या दिल्या जात; केली होती तक्रार

त्या दिवसी मी तेथे हजर होवुन कामकाजाला सुरवात केली होती. माझ्या सोबत ड्युटीला इंटर राजकुमार सोपान गवले, ओम डोलारे, संचालीका अंजली पॉटील असे हजर होते. मी सलग तीन महीने काम केले परंतु माझी त्यानी पगार केली नव्हती. त्या नंतर तीन महीन्यानी त्यांनी माझी एकदाच पगार केली होती. त्या नंतर तेथे नोकरीस असलेले डॉक्टर राजकुमार सोपान गवळे रा पाटोदा जळकोट जि लातूर हे देखील तेथे वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरीस आहेत. ते सतत माझ्या डयूटी मध्ये हस्तक्षेप करून माझ्या वैद्यकीय तपासणी मध्ये चुका काढुन मला मानसिक त्रास देण्यास सुरवात केली होती. तेथील ओम डोलारे हा व्यक्ती हा 12 वी पास असुन तो तेथे एक्सपायर झालेल्या गोळ्या तेथील रुग्णांना देतो. व मी दिनांक 15/12/2022 रोजी दुपारी दोन वाजता त्यांना विचारण्यासाठी गेले असता तो मला मारण्यासाठी अंगावर धावुन आला.

राजकुमार गवळे याने केली शरीर सुखाची मागणी

मी त्या बाबत डॉक्टर राजकुमार गवळे याच्याकडे तक्रार केली त्यावेळी त्यांनी त्याच्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
दिनांक 31/12/2022 रोजी रात्री 01.00 वाजता मी व्यसनमुक्ती केंद्र वाघाळा ता. अंबाजोगाई येथे ड्यूटीवर असतांना माझ्या सोबत ड्युटीवर असलेले डॉक्टर राजकुमार सोपान गवळे रा. पाटोदा, जळकोट जि. लातुर यांनी मला शरीर सुखाची मागणी केली. त्या गोष्टीचा मी त्यांना विरोध केला व मी त्यांना खडसावले तर मला दिनांक 01/01/2023 रोजी पुरुष व महीला कर्मचारी यांना सांगून मला जबरदस्तीने माझा मोबाईल हिसकाऊन घेवुन मानसिक रुग्न आहे. म्हणुन मला आडमीट केले व मला झोपेचे लोराझेपाम इंजेक्शन देवुन झोपी घातले त्या नंतर माझ्या घरच्यांना फोन करून माझ्यावर मानसिक परिणाम झालेला आहे. व समोपदेशक प्रदीप पवार यांना फोन करून घरच्याच्या ऍडमिशन पेपरवर सह्या घेण्यास सांगीतले व घरच्यांनी त्यांना सह्या करण्यास नकार दिला. त्या नंतर माझ्यावर चुकीचे औषधोपचार करून माझी मानसिक व शरीरीक स्थिती खराब केली.

मनोरुग्ण ठरवून वेशा व्यवसाय करण्यास सांगितले

या बाबतीत मी विजय पवार एम. डी. मानसोपचार तज्ञ याना सांगीतले त्यांनी मला संचालिका अंजली पाटील यांना बोलू असे म्हणाले. त्या नंतर अंजली पाटील यांनी मला कोठे बोललीस तर मी तुला येथेच डाबुन ठेवीन व तुला मारहाण करीन व माला वेश्या व्यवसाय करण्यास सांगीतले. आणि डिस्चार्ज करतांना पुरुष कर्मचारी समोर आणून मारण्याची धमकी देवून ऍडमीशन पेपर, पगाराच्या रजिस्टरवर माझ्या सह्या करून घेतल्या. मी मनोरुग्ण आहे असे साबीत करुन झालेला गैरप्रकार दाबण्याचा प्रयत्न करुन माझी मानहाणी करत आहेत.

अंजली पाटील यांना मी माझ्यासाठी वर शोधण्यासाठी सांगितले असता त्या मला म्हणाल्या की तुमच्या सारख्या महार मागाच्या मुलीना वापर करून सोडायचे आसते तुमचे लग्न करायचे नसतात. असे तेथील पुरुष व महीला कर्मचा-या समक्ष मला शिवीगाळ करुन जातीवाचक बोलून माझी मानहाणी केली आहे.
सदरची घटना मी समाजिक कार्यकता शैलेद्र बाबुराव कांबळे रा. नागझरी परीसर अंबाजोगाई (वचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष बीड), सौ. अंजली नरसु जगदेव रा. रायगड नगर अंबाजोगाई, मोहीणी मधुकर कांबळे रा. मिनाताई ठाकरे चौक अंबाजोगाई, परमेश्वर मोहन जोगदंड रा. परळीवेस अंबाजोगाई व गोविंद खंड मस्केरा संतकबीर नगर अंबाजोगाई यांना झालेला प्रकार सांगीतलेला आहे.
म्हणुन माझी 1. राजकुमार सोपान गवळे रा. पाटोदा, जळकोट जि लातुर (जात-महार) 2. अंजली बाबुराव पाटील रा. नवजिवन व्यसमुक्ती केंद्र वाघाळा ता. अंबाजोगाई (जात मराठा) 3. ओम डोलारे रा अंबाजोगाई (जात धनगर) यांच्या विरुध्द माझी तक्रार आहे. मी आज पर्यत आजारी असल्याने मी आज रोजी पोस्टेला हजर येऊन तक्रार देत आहे. माझी वरील फिर्याद माझे सांगणे प्रमाणे संगणकावर मराठीत टाईप केली आसुन वाचुन पाहीली. सांगणे प्रमाणे बरोबर व खरी आहे. सदरील फिर्याद ही ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक बी. पी. कोळी व महिला पोलिस शिपाई द्रोपदा उरला बोंबले यांच्या समक्ष नोंदवण्यात आली आहे.

ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनला संदरील फिर्यादी नुसार
नवजिवन व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका सौ. अंजली पाटील यांच्यासह राजकुमार सोपान गवळे आणि ओम डोलारे यांच्या विरोधात अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमाती 3(1)(r), 3(1) (5), (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम ,1989 7 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जाती 3 (2) (va), अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989, भारतीय दंड संहिता 1860 कलम 354-A, 504, 506,34 या कलमान्वये 9 मार्च रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे‌.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker