नत्य म्हणजे स्त्री पुरुषांच्या भावभावनांचे कलात्मक प्रगटीकरणाच्या सृजनशीलतेची शक्ती; सुदर्शन रापतवार
Natya is the creative power of artistic expression of male and female emotions; Sudarshan Raptawar
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/IMG_20220822_141841.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/IMG_20220822_141841.jpg)
नृत्य म्हणजे स्त्री पुरुषांच्या भावभावनांचे कलात्मक प्रगटीकरणाच्या सृजनशीलतेची शक्ती म्हणजे नृत्य आहे असे मत माध्यम न्यूज नेटवर्क चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांनी नवकेशर डान्स ऍन्ड ड्रामा ऍकॅडमी च्या पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करताना व्यक्त केले.
नवकेशर डान्स ऍन्ड ड्रामा ऍकॅडमी च्या विद्यार्थ्यांना नांदेड येथे आयोजित केलेल्या सप्तरंग सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय फेस्टीवल स्पर्धेत पुरस्कार मिळवलेल्या सहा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला होता. या कार्यक्रमात सुदर्शन रापतवार बोलत होते. “आपली आवड” या हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या दिमाखदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पृथ्वीराज साठे तर प्रमुख अतिथी म्हणून मनोविकार तज्ज्ञ डॉ. राजेश इंगोले, ऍम्पा डॉक्टर संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. राहुल धाकडे, रोटरीचे अध्यक्ष मोईन, पत्रकार अविनाश मुडेगावकर, अभिजित गाठाळ, शिवकुमार निर्मळे, दत्ता अंबेकर, महादेव गोरे, नागेश औताडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
आपल्या विस्तारीत भाषणात सुदर्शन रापतवार पुढे म्हणाले की, भारतीय अभिजात कलांमध्ये नृत्य कलेला फार मोठी परंपरा लाभली आहे.भारतीय नृत्य शास्त्राचा प्राचीन ग्रंथ भरत मुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र असले तरी प्रत्येक ठिकाणच्या संस्कृती, परंपरा, लोककला, सामाजिकता यांच्या संयोगाने शास्त्रीय नृत्य परंपरेचे वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले. हा सगळा संदर्भ लक्षात घेतला तरी नृत्य म्हणजे स्त्री ु पुरुषांच्या भावभानांचे कलात्मक प्रकटीकरणाच्या सृजनशीलतेची शक्ती आहे असेच म्हणावे लागेल.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/IMG_20220822_141757.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/IMG_20220822_141757.jpg)
नृत्यात कारकीर्द करू इच्छिणाऱ्याला नृत्याचा इतिहास व व्यावसायिक पार्श्वभूमी माहीत असावी लागते. नृत्य ही ललित कला आहे. नृत्य म्हणजे नाचणे, या धातूवरून नृत्य, नृत, नर्तन इ. शब्द बनले आहेत. या ‘नृत्याच्या अनेकांनी अनेक व्याख्या दिल्या आहते. अभिनय दर्पण ग्रंथातील एक व्याख्या नेहमी उद्धृत केली जाते.
नवकेशर डान्स ऍन्ड ड्रामा ऍकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी नृत्य कलेला शिक्षणाची जोड देऊन आपला वैयक्तिक आणि नृत्य कलेचा विकास करावा असे आवाहन त्यांनी करुन नवकेशर डान्स ऍन्ड ड्रामा ऍकॅडमी ने मागील १४ वर्षांपासून अंबाजोगाई शहरात नवा उपक्रम सुरु केला आणि शहरातील विद्यार्थ्यांना एक वेगळा प्लॅटफॉर्म निर्माण करुन दिला याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेश इंगोले, ऍम्पा चे तालुकाध्यक्ष डॉ. राहुल धाकडे, माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी नवकेशर डान्स ऍन्ड ड्रामा ऍकॅडमी घ्या कार्याचे कौतुक करुन सर्व उपक्रमास शुभेच्छा दिल्या व पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमात सप्तरंग सेवाभावी संस्था नांदेड आयोजित राष्ट्रीय सप्तरंग फेस्टिव्हल मधील मायनर ग्रुप नृत्य स्पर्धेत प्रथम आलेल्या मानवी प्रभाकर पतंगे प्रथम (मॉडर्न ), मानवी प्रभाकर पतंगे,,,प्रथम (लावणी), स्वराज राहुल माने,,तृतीय (फोक) सब ज्युनियर ग्रुप मध्ये आराध्या जगदाळे,,,प्रथम (मॉडर्न), ज्युनिअर ज्युनियर ग्रुप मध्ये युवराज नागेश औताडे,,उत्तेजनार्थ (मॉडर्न), गणेश बाहेती उत्तेजनार्थ (मॉडर्न), ज्युनियर ग्रुप मध्ये ऋषिकेश गजानन मुंदडा, प्रथम (फोक), आस्था मनोज डांगे, द्वितीय (फोक) या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सुरेख संचलन प्रा. अनंत कांबळे यांनी केले. प्रास्ताविक नवकेशर डान्स ऍन्ड ड्रामा ऍकॅडमीचे सचीव भिमाशंकर शिंदे यांनी केले तर आभार नवकेशर सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष सौ. आरती शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमास पुरस्कार प्राप्त विद्यार्थी त्यांचे पालक व इतर मान्यवर उपस्थित होते.