दावोस येथे सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम – 2025 मध्ये आज आपल्या परळी तालुक्यातील नंदागौळ या छोट्याशा गावातील नागरिक असलेले श्री भरत गित्ते यांच्या टॉरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने महाराष्ट्रात सुपा व अहिल्यानगर या दोन ठिकाणी 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा महाराष्ट्र शासनासोबत सामंजस्य करार केला असून, याद्वारे आपल्या लोकांसाठी उत्तम रोजगाराच्या सुमारे 1200 पेक्षा अधिक संधी उपलब्ध करणे आणि उत्पादन क्षेत्रात जगात आपल्या देशाला अग्रस्थानी घेऊन जाण्याच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे.
परळी तालुक्यातील छोट्याशा गावातून येऊन राज्य व देशासाठी मोठं स्वप्न पाहण्याचं धाडस करणाऱ्या भरत गित्ते यांच्या प्रयत्नातून अत्याधुनिक ॲल्युमिनियम कास्टिंग सोल्युशन निर्माण करून ते जगभरात निर्यात करता येईल, अशा पद्धतीचे प्रकल्प उभारण्यात येणार असून श्री भरत गित्ते व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा मला अभिमान आहे.
महाराष्ट्र शासनाने टॉरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ही संधी उपलब्ध करून परळीकरांना हा बहुमान प्राप्त करून दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस तसेच उद्योग मंत्री, मित्रवर्य मा. उदयजी सामंत यांचे मनःपूर्वक आभार तसेच टॉरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे भरत गित्ते व सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन…!
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.