महाराष्ट्र

नंदकिशोर मुंदडा यांच्या इफ्तहार कार्यक्रमास मोठी उपस्थिती

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी आयोजित केलेल्या इफ्तहार कार्यक्रमास शहर व परिसरातील मुस्लिम समाज बांधवांनी मोठी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमास आलेल्या मुस्लिम बांधवांचे स्वागत आ. नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा आणि नंदकिशोर मुंदडा यांनी स्वतः प्रत्येकाची वैयक्तिक भेट देवून केले.


अंबाजोगाई शहर व परिसरातील हिंदु आणि मुस्लिम बांधवांमध्ये गेली अनेक वर्षांपासून सुरू असलेला जातीय सलोखा कायम रहावा व येणा-या नव्या पिढीमध्ये ही या जातीय सलोख्यिची बीजे पेरली जावीत यासाठी गेले अनेकवर्षापासुन नंदकिशोर मुंदडा यांच्या वतीने शहरातील राजस्थानी मंगल कार्यालयात इफ्तहार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. नंदकिशोर मुंदडा आणि परिवाराशी गेली अनेक वर्षे सातत्याने सलोख्याचे आणि स्नेहाचे संबंध असलेले मुंदडा परीवाराचे अनेक मित्र हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. नंदकिशोर मुंदडा, त्यांचे पुत्र अक्षय मुंदडा हे शहर आणि परिसरातील अधिकाधीक मुस्लिम बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतात.

शहरातील प्रत्येक मस्जिद मध्ये नमाज अदा करण्यासाठी येणा-या मुस्लिम बांधवांना नमाज पठणानंतर या इफ्तहार कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती करतात, यामुळे मुंदडा परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास हजारो मुस्लिम बांधव उपस्थिती लावतात.


९. एप्रिल रोजी नंदकिशोर मुंदडा यांनी आयोजित केलेल्या या इफ्तहार कार्यक्रमास शहरातील हजारो मुस्लिम बांधवांनी उपस्थिती लावली. यावेळी नंदकिशोर मुंदडा, आ. नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा यांच्या सह माजी उपनगराध्यक्ष शेख रहीम शेख रज्जाक, माजी नगराध्यक्ष महादु मस्के, नगरसेवक ताहेर भाई, सुजात शेख, सारंग पुजारी, अनंत अरसुडे, वैजनाथ देशमुख, ऍड. संतोष लोमटे, नुर पटेल यांच्या सह शहरातील अनेक हिंदु बांधवांनी इफ्तहार कार्यक्रमास आलेल्या मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या.


नंदकिशोर मुंदडा यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास मुस्लिम समाजातील अनेक प्रतिष्ठित मान्यवरांसह उपविभागीय अधिकारी शरद झाडके, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख कविता नेरकर, तहसीलदार विपीन देशमुख, गटविकास अधिकारी समृध्दी दिवाणे, पोलिस निरीक्षक घोळवे, वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. सिध्देश्वर बिराजदार, डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. अभिमन्यु तरकसे, डॉ. संदीप निळेकर, डॉ. संजय चव्हाण, लोखंडी सावरगाव येथील वृद्धत्व निवारण उपचार केंद्राचे डॉ. चव्हाण, शहरातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक डॉ. सुधीर धर्मपात्रे, डॉ. बाहेती व इतर मान्यवर, वकील संघाचे सदस्य, पत्रकार, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker