महाराष्ट्र

धमकी देऊन जयंतीची वर्गणी मागणे पडले महागात; गुन्हा दाखल


विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशासह जगात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी केली जाते. मात्र धमकावून जयंतीची वर्गणी मागणे एका युवकाला चांगलेच महागात पडले असून शहरातील एका सामाजिक कार्यकर्त्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी एका तरुणावर चक्क वर्गणीच्या नावाखाली धमकी देऊन खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
महापुरुषांचे विचार नव्या पिढीमध्ये रुजले जावे यासाठी जयंती साजरी केली जाते. मात्र हल्ली जयंती म्हटली की अवांतर खर्च केला जात आहे. डॉल्बी, डिजे लावून नाच गाणे करणे म्हणजे जयंती अशी संकल्पना हल्ली युवकांमध्ये रुजली जात आहे. यामुळे महापुरुषांचे विचार बाजूला पडत असल्याचे पहावयास मिळत आहे. हल्ली डॉल्बी, डिजे लावण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागत आहेत, आणि हा सर्व खर्च करण्यासाठी मग विषय येतो तो वर्गणी गोळा करण्याचा, कारण एवढा मोठा खर्च करणे शक्य होत नाही.
अंबाजोगाई शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त वर्गणीच्या नावाखाली जास्तीच्या पैशाची मागणी करून खंडणी मागितली आणि पैसे दिले नाही तर तुला व तुझ्या नगरसेविका पत्नीला वार्डात फिरू देणार नाही अशी धमकी फोनवर दिल्याची घटना गुरुवार (दि.०६) रोजी शहरात घडली आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते महादेव आदमाने यांच्या फिर्यादीवरून बादल मिलिंद तरकसे (रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) याच्यावर शहर ठाण्यात कलम ३८४,५०७ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पो.ह. भोले करत आहेत. दरम्यान या घटनेनंतर वर्गणी मागणारांचे धाबे दणाणले आहेत.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker