देशी प्रजातीच्या पशुधनातसंख्यातृमक व गुणात्मक वृध्दी आवश्यक; प्राचार्य डॉ बाबासाहेब ठोंबरे यांचे मत
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/DSC_0550.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/DSC_0550.jpg)
लातूर येथील कृषि महाविद्यालयात पोळा सन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी बोलताना डॉ.बाबासाहेब ठोंबरे म्हणाले की, भारतीय संस्कृतीत ऋतूनूसार वेगवेगळया सणांचे महत्व आहे. शेतकरी वर्गात आकर्षणाचा व उत्साहाचा पोळा हा सण आहे. नवनवीन तंत्रज्ञानामुळे व शेतीच्या विभागणीमुळे बैलांचे शेततील अस्तित्व हळूहळू कमी होत आहे. शेती शाश्वत करण्यासाठी व दरडोई दुध उपलब्धता वाढविण्यासाठी देशी प्रजातीच्या पशुधनात संख्यात्मक व गुणात्मक वृध्दी आवश्यक आहे.
कृषि महाविद्यालयात डॉ.ठोंबरे यांच्या नेतृत्वात व डॉ.हेमंत पाटील, डॉ.विश्वनाथ कांबळे,डॉ.भागवत इंदुलकर,सोपानराव शिंदे, बाबुराव शिंदे, डॉ.दिनेशसिंह चौहान, डॉ.प्रशांत करंजीकर, डॉ.पद्माकर वाडीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैलपोळा सण उत्साहात साजरा केला. गोवंशाची छान सजावट करत हनुमान मंदीराच्या भोवती मिरवणुक काढण्यात आली. गोठ्या समोर बैलांची विधीवत पूजा करण्यात आली तसेच बैलांना पुरणपोळी खाऊ घालण्यात आली. उपस्थित प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, मजूर व विद्यार्थी यांनी पुरणपोळीच्या वनभोजनाचा आनंद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.अनंत शिंदे, डॉ.विजय भामरे, डॉ.अनिलकुमार कांबळे, डॉ.संघर्ष शृंगारे राहुल औंधकर, अजिनाथ फाळके, सुधीर सदर, रावसाहेब आडे तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.