महाराष्ट्र
देवस्थानांना जोडणा-या रस्त्यावर दुर्गंधीचे साम्राज्य ; भाविकात असंतोष


अंबाजोगाई शहरासोबतच संपुर्ण महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या आद्यकवी मुकुंदराज स्वामी, संत दोसोपंत, बुट्टेनाथ, नागनाथ, बाराखांबी, भुचरनाथ मंदीर यासह इतर अनेक मंदिराकडे जाणारा रस्त्यावर प्रचंड दुर्गंधी पसरली असून या दुर्गंधीमुळे भावनीक, वाटसरु त्रस्त झाले आहेत.
शहराच्या उत्तरेस माता योगेश्वरी मंदीरा समोरुनजाणाऱ्या मुकुंदराज स्वामी महाराज मंदीर रस्त्यावर शहरातील चिकण, मटण,आंडे,मच्छी व्यावसायीक हॉटेल व गाडेवाले हे रस्त्यावर हॉटेलमध्ये उरलेले मांस व ईतर अन्न रस्त्यावर फेकत आहेत.दुर्गंधीने वारकरी, वाटसरू व सकाळी फिरायला जाणारे नागरीक त्रस्त झाले आहेत. दुर्गंधी पसरवनाऱ्यावर सबंधीतावर नगर पालीका प्रशासणाने गांभीर्याने घेऊन मज्जाव करुण कारवाई करण्याची मागणी जागरुक नागरीक करत आहेत.


श्री योगेश्वरी देवी मंदीरासमोरुन जाणारा रस्ता हा सर्वज्ञ दासोपंत, महामृत्युंजय, रेणुकामाता, बाराखांबी, मुकूंदराज स्वामी महाराज, घाटनागनाथ, बुट्टेनाथ आशी आनेक देवी देवतांचे मंदीर हे डोंगराच्या कुशीत आहे.पुढे हा रस्ता येल्डा, कुरनवाडी,चिंचखंडीसह वाडी वस्ती,तांडा व ईतर गावाला रस्ता जातो. त्यामुळे यारस्त्यावर दिवस रात्र वहानाची व नागरीकांची गर्दी आसते.श्री मुकूंदराज स्वामी महाराज मंदीराच्या दर्शनासाठी सर्वाधीक एकादशीला माळकरी,भावीभक्त व वारकऱ्यांची गर्दी आसते. इतर शिव मंदीराला श्रावणात, देवी मंदीराला दसरा, मंगळवार,शुक्रवार भावीकांची मोठी वर्दळ आसते.तर पर्यटकांची सर्वाधीक गर्दी ही जुन ते फेब्रूवारी पर्यंत आसते. दररोज भल्या पहाटेपासुन सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरीकांची ये जा सुरु आसते.आश्या वर्दळीच्या रस्त्यावर शहरातील चिकण, मटणाचे व्यावसाय करनारे हॉटेलवाले व अंडयाचा धंदा करनारे गाडेवाले हे रात्रीच्या वेळी खराब आन्न, मांस ही रस्त्यावर बिनधास्तपणे फेकून मोकळे होत आहेत. त्यामुळे रस्त्यावर दुर्गंधी सुटत आहे. या रस्त्यावरुन ये जा करणाऱ्या नागरीकावर तोंडाला रुमाल बांधून जाण्याची वेळ आली आहे. रविवारपासुन श्रावण महिणा सुरू होत आसल्याने या रस्त्यावर भावीकांची गर्दी मोठया प्रमाणात होत आसते. नगरपालीका प्रशासणाने गांभीर्याने घेऊन रस्त्यावर घाण टाकूण दुर्गंधी पसरवणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी जागरूक नागरीक करत आहेत.