महाराष्ट्र
दिपा मुधोळ-मुंडे बीडच्या जिल्हाधिकारी


बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची बदली झाली आहे. नव्या जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ – मुंडे यांची नियुक्ती झाली आहे.
राधा बिनोद शर्मा यांची बदली
साधारण पणे वर्षभरापूर्वी बीडच्या जिल्हाधिकारी म्हणून राधाबिनोद शर्मा यांची नियुक्ती झाली होती. गेल्या वर्षभरात शर्मा यांनी काही विशेष कामगिरी केली नाही. काही दिवसापासून शर्मा यांच्या बदलीची चर्चा सुरू होती.
दरम्यान शर्मा यांची बदली झाली असून नव्या जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ मुंडे या रुजू होणार आहेत. त्या सध्या सांगली येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.