त्रिवेणी संगमाचा धनी; राजकिशोर मोदी


उपलब्ध असलेल्या राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमीचा आधार घेत आपल्या स्वतः ची वेगळी ओळख निर्माण करुन शहरातील हजारो लोकांच्या गळ्यातील ताईत बनतं ही तशी सहज आणि तेवढी सोपी गोष्ट नाही. पण ही लिलया सहज साध्य केली आहे ती राजकिशोर मोदी यांनी.
राजकिशोर मोदी हे नांव परिचीत नाही असे म्हणणारा सहज कोणी भेटणार नाही. सहकार, शिक्षण, राजकारण, समाजकारण या विषयावर गप्पा सुरु झाल्या की, राजकिशोर मोदी यांचे नाव निघण हे अनिवार्य आहे. राजकिशोर मोदी यांना अल्पसा राजकीय वारसा असला तरी एका पिढीनंतर लुप्त झालेल्या या राजकीय वारशाचे पुनर्जीवन करीत स्वतः ची ओळख निर्माण करुन हा वारसा मागील पिढीशी जोडणे हे तसे अवघड काम आहे. लाखो लोकांमधुन एखाद्या लाच तसे भाग्य मिळते.
राजकिशोर मोदी यांचे जीवन हे तसे शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापासून तसे राजकारण आणि खेळाशी संबंधित राहीले आहे.शालेय जीवनात ते खो-खो खेळाचे तर महाविद्यालयीन जीवनात ते हॉलीबॉलचे उत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखल्या जायचे. खेळाशी अनेकवर्षे निगडीत राहिल्यामुळे सामाजिक राजकीय जीवनातील त्यांचा वावर हा सतत खिळाडु वृत्ती चा राहीला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
महाविद्यालयीध शिक्षण घेत असताना ते कॉंग्रेस पक्षाचे तत्कालीन मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या संपर्कात आले आणि मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ते डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या पॅनल मधील उमेदवार बनले. त्यांच्याच आशीर्वादाने या निवडणुकीत ते विजयी झाले, तेथ पासुन ते आजपर्यंत सतत विजयाचा गुलाल त्यांच्या माथी लागत आला आहे.
मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटवर काम करीत असताना त्यांनी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाच्या एनएसयुआय या विद्यार्थी विंग चे नेतृत्व केले. पुढे युवक काँग्रेस, फादर कॉंग्रेस आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास थक्क करुन सोडणारा आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच त्यांनी राजकारणासोबत शिक्षण आणि सहकार क्षेत्रात काम करण्याचा मानस व्यक्त केला. जुन १९८९ मध्ये त्यांनी जोधाप्रसाद मोदी शिक्षण प्रसारक मंडळ आणि योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेचे रजिस्ट्रेशन करुन गावात सर्वप्रथम निवासी मुक बधीर विद्यालय आणि सहकारी पतसंस्थेची सुरुवात केली.
१९८९ साली राजकारण, सहकार आणि शिक्षण क्षेत्रात केलेलं सुरुवात ही सतत आपले कार्यकौशल्य वाढवत
शहर विकासाचा एक अविभाज्य घटक बनली. सहकार क्षेत्रात १९८९ साली योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून केलेली सुरुवात पुढे अंबाजोगाई पिंपल्स बॅंक आणि श्री योगेश्वरी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला नागरी सहकारी पतसंस्था, अल फलाह नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करीत संपुर्ण महाराष्ट्रात आपल्या शाखा स्थापन करीत दैदिप्यमान यश संपादित करीत कार्यरत राहिली.
दुसरीकडे १९८९ साली बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून सुरु केलेले शैक्षणिक उपक्रम ही तेवढ्याच गतीने विविध विषयातील शिक्षणाची गंगा शहरात आणून शहरातील हजारो मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून एक शाश्वत जीवन जगण्याची हमी त्यांच्यामध्ये निर्माण करु शकली. आज शहरात बालाजी शिक्षण मंडळाच्या घाटनागनाथ प्राथमिक विद्यालय, जोधाप्रसाद मोदी माध्यमिक विद्यालय, जोधाप्रसाद मोदी कनिष्ठ महाविद्यालयीन, न्युज व्हिजन पब्लिक स्कूल (सीबीएससी पॅटर्न), अध्यापक महाविद्यालय (डी.टी.एड), अध्यापक महाविद्यालय (बी.एड.), संगणकशास्त्र, माहिती व तंत्रज्ञान महाविद्यालय (बीएससी, बीसीए, बीसीएस, आय.टी) महाविद्यालय, औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय (डी. फार्मा), औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय (बी फार्मा ऍन्ड एम फार्मा), मानवविकास मुक बधीर विद्यालय, मानवविकास निवासी मतीमंद विद्राव्य, मानव विकास अपंग विद्दालय मानव विकास बालसदन, बालभवन व बालकाश्रम, मिलिंद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित मातोश्री मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह आदि शैक्षणिक संकुलामार्फत ज्ञानदानाचा यज्ञ सतत तेवत ठेवला आहे.
राजकिशोर मोदी यांचा राजकीय प्रवास ही थक्क करुन सोडणारा आहे. कॉंग्रेस पक्षाचा साधा कार्यकर्ता ते कॉंग्रेस पक्षाचा राज्य सचीव, एक सामान्य नगरसेवक ते अखिल भारतीय नगराध्यक्ष संघटनेचा जबाबदार पदाधिकारी, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचा सदस्य, कापुस पणन महासंघाचा राज्य उपाध्यक्ष इथं पर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास थक्क करुन सोडणारा आहे.
आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात त्यांनी डॉ पद्मसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली केली असली तरी राज्यातील वेगवेगळ्या नेत्यांशी त्यांनी साधलेली जवळीक कौतुकास्पद आहे. पद्मसिंह पाटील, विलासराव देशमुख, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, खा. यांच्या शरद पवार, अजित पवार, आ. धनंजय मुंडे यांच्या सह राज्यातील अनेक मान्यवर नेतृयांशी त्यांचे अत्यंत ऋणानुबंधाचे आणि स्नेहाचे संबंध राहीले आहेत.
खेळामध्ये नैपुण्य गाजवत असतानाच त्यांच्या अंगी निर्माण झालेली खिळाडुवृत्ती आज ही टिकून असल्यामुळे सहकार, शिक्षण आणि राजकारण या तीन ही क्षेत्रातील धनी होण्याचे भाग्य राजकिशोर मोदी यांना लाभले आहे. म्हणूनच या “तीन क्षेत्राचा धनी: राजकिशोर मोदी” ही बिरुदी त्यांना सार्थ ठरणारी आहे. राजकिशोर मोदी यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!