तीन साहित्य संमेलन अध्यक्षांचा प्रा. रंगनाथ तिवारी यांच्या हस्ते सत्कार


मराठवाडा साहित्य परीषदेच्या अंबाजोगाई शाखेची मासिक मैफल २१ नोव्हेंबर रोजी होणार असून या मैफलीत तीन वेगवेगळ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेल्या अमर हबीब, दगडु लोमटे आणि डॉ. शेषेराव मोहीते यांचा ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ तिवारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.


अंबाजोगाई मसापची मासिक मैफल २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जिजामाता कॉलनी मधील रोटरी क्लब च्या इ लायब्ररी या सभागृहात होणार असुन या कार्यक्रमात घनसावंगी येथे होणा-या मराठवाडा साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. शेषराव मोहिते, घाटनांदुर येथील म.दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अमर हबीब तर नेपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या शब्द परीवार, अमरावती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दगडु लोमटे या तीन अध्यक्षांचा सत्कार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ तिवारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.