ठळक बातम्या

डॉ. सचीन चौधरी यांची सहयोगी प्राध्यापक म्हणून नियुक्ती

डॉ. अरविंद बगाटे यांची प्राध्यापक म्हणून तर डॉ. सचीन चौधरी आणि डॉ. करुणा गायसमुद्रे यांची सहयोगी प्राध्यापक म्हणून नियुक्ती
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पॅथॉलॉजि विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. अरविंद बगाटे यांची प्राध्यापक म्हणून मेडिसीन विभागात कार्यरत असलेले सहाय्यक प्राध्यापक डॉ. सचीन चौधरी आणि डॉ. करुणा गायसमुद्रे यांची महाराष्ट्र लोक सेवा आयोगाने सहयोगी प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक यांचे नियुक्ती आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले असून त्यामध्ये डॉ. अरविंद बगाटे यांची प्राध्यापक म्हणून तर डॉ.
सचीन चौधरी आणि डॉ. करुणा गायसमुद्रे यांची सहयोगी प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली आहे.
मेडिसीन विभागातील सहयोगी प्राध्यापकांच्या रीक्त जागा भरण्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये राज्यातील १२ सहयोगी प्राध्यापकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून या १२ सहयोगी प्राध्यापकांमध्ये डॉ. किरण डावळे यांचे नांव प्रथम क्रमांकावर आहे तर डॉ. सचीन चौधरी यांचे नांव व्दितीय क्रमांकावर आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील दोन सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्त्या सहयोगी प्राध्यापक म्हणून करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्राध्यापक म्हणून डॉ. अरविंद बगाटे यांची तर सहयोगी प्राध्यापक म्हणून डॉ. सचीन चौधरी, डॉ. करुणा मॅडम यांच्या नावांचा समावेश आहे.
सहयोगी प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल डॉ.किरण डावळे, डॉ. सचीन चौधरी, डॉ. अरविंद बगाटे आणि डॉ. करुणा गायसमुद्रे यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button