महाराष्ट्र
डॉ. वसंतराव देशपांडे स्मृतीदिन बरसल्या सुरांच्या धारा


संगीताच्या बागेतील ब्रम्हकमळ संगीतसूर्य स्व.डॉ.वसंतराव देशपांडे यांच्या पुण्यस्मृतीदिनी ३१ जुलै रोजी रात्री आयोजित संगीत सभेत सुरांच्या धारा बरसल्या
संगीत सभेची सुरुवात अभियंता आनंद अरूणराव जोशी व प्रा. अतुल अरुणराव जोशी यांनी केली नंतर बी.के.पांडे,डॉ.अतुल कुंबेफळकर,सुचिता देशपांडे,युगंधरा जोशी, आनंद देशपांडे, राजदिप जोशी,राहुल देशपांडे आदींनी गायनाचे सादरीकरण केले.हार्मोनिअमवर बी.के.पांडे यांनी तर तबल्यावर रत्नदीप शिगे यांनी साथसंगत केली प्रारंभी राहूल देशपांडे यांनी प्रास्तविकातून स्मृती समितीच्या उपक्रमाची माहिती दिली.
उपस्थितांचे आभार प्रा.अतुल जोशी यांनी मानले.उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी श्रीमती आरती जोशी आदी उपस्थित होते.