डॉ. भाऊराव यादव व डॉ.उर्वी यादव मार्ग दीप भुषण पुरस्काराने सन्मानित
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221129_194902.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221129_194902.jpg)
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नामांकित स्त्रीरोग प्रसूती शास्त्रज्ञ व विलासरावजी देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथील स्त्री रोग व प्रसुती शास्त्र विभाग प्रमुख सुप्रसिद्ध प्रा.डॉ.भाऊराव यादव यांना व त्यांची कन्या उर्वी भाऊराव यादव हीला नाशिक येथील आम्ही मार्गदीप प्रतिष्ठान औरंगाबाद व शासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने 74 व्या भारतीय संविधान दिनानिमित्त आम्ही भारताचे लोक या दुसऱ्या विचार संमेलन संमेलनात “मार्ग दीप भूषण पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले.
आम्ही मार्गदीप प्रतिष्ठान औरंगाबाद यांच्या वतीने देण्यात येणारा मानाचा” मार्ग दीप भूषण पुरस्कार “त्यांच्या स्त्रीच्या आरोग्या विषयी सामाजिक कार्या, जनजागृती ,त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल देण्यात आला. व त्यांची मुलगी उर्वी भाऊराव यादव हिने दहावी मध्ये सीबीएससी पॅटर्न 500 पैकी 499 घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल तिलाही मार्गदर्शक भूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र साहित्य संमेलन परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबे ,कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत उत्तम कांबळे , प्रमुख वक्ते म्हणून जे एन यु विद्यापीठाचे प्राध्यापक साहित्यिक शरद बाविस्कर ,मराठा महासंघाच्या प्रवक्त्या अँड वैशाली डोळस, सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांच्या उपस्थितीत देण्यात आला .यावेळी कार्यक्रमाचे आयोजक औरंगाबाद जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे,आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्याचे उपायुक्त प्रदीप पोळ ,
आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त सुदर्शन नगरे व आम्ही मार्गदर्शन प्रतिष्ठान औरंगाबाद व शासकीय अधिकारी कर्मचारी संघटना नाशिक यांचे सर्व पदाधिकारी व सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.