डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी काम केले; प्रा. पंडीत कराड


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी काम केले असे मत योगेश्वरी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उप प्राचार्य प्रा. पंडीत कराड यांनी व्यक्त केले.
जयहिंद ग्रुपच्या वतीने भीमजयंती निमित्त केले वड व पिंपळ वृक्षारोपण
भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जय हिंद ग्रुपच्या वतीने वड व पिंपळ वृक्ष लावून साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी तसेच येणाऱ्या पिढीवर पर्यावरणीय मूल्य रुजवण्यासाठी तसेच भविष्यात होणारी ऑक्सिजनची कमतरता टाळण्यासाठी एका अनोख्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला दिली समतेची शिकवण ; प्रा. पंडीत कराड
यावेळी बोलत असताना जय हिंद ग्रुपचे मार्गदर्शक व योगेश्वरी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. पंडीत कराड आपल्या विस्तारीत भाषणात पुढे म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला समतेची शिकवण दिली तसेच देशाला संविधान दिले. आज या संविधानावरच सर्व देश कार्य करीत आहे. तसेच त्यांनी देशाला जलसाक्षरतेचे धडे दिले व जलसंवर्धनाविषयी त्यांची खूप मोठे कार्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जागृत रहाव्यात यासाठी आपण ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करीत आहात. याद्वारे भविष्यातील ऑक्सिजनची कमतरता टाळण्यास मदत होईल तसेच वृक्षारोपणाने प्रदूषण मुक्त भारताचे स्वप्न साकार होईल . तसेच येणाऱ्या पिढ्यांवर पर्यावरणीय मूल्य रुजवण्याचा याद्वारे प्रयत्न केला जात आहे. ही अतिशय अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.


मेजर एस पी कुलकर्णी यांनी केले प्रास्ताविक
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयहिंद ग्रुपचे प्रमुख मेजर प्रा. एस.पी. कुलकर्णी यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात मेजर कुलकर्णी यांनी जयहिंद ग्रुपच्या वतीने आज पर्यंत घेण्यात येणा-या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी गतवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या वृक्षाचा वाढदिवस साजरा करण्यात आला व असाच दरवर्षी जयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्याचा संकल्प करण्यात आला.
यांची होती प्रमुख उपस्थिती!
यावेळी निवृत्त कार्यकारी अभियंता बलभीम लांब, माजी मुख्याध्यापक शिवकुमार निर्मळे, लंकेश वैद्य, माजी उपप्राचार्य पंडितराव कराड, योगेश्वरी कर्मचारी पतसंस्थेचे सहसचिव संतोष चौधरी ,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.एम.डी.आचार्य,कार्यकारी अभियंता मंचकराव फड, वैभव चौसाळकर ,राहुल घाडगे यांची उपस्थिती होती.