महाराष्ट्र , मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यांचे रेल्वे सल्लागार म्हणून नियुक्ती
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने डॉ. आदित्य पतकराव यांच्यावर महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या रेल्वे विकास सल्लागार समितीवर नियुक्ती केली आहे. डॉ. आदित्य पतकराव यांच्या जिज्ञासू स्वभावामुळे या तीन ही राज्यांच्या रेल्वे विकासाला गती मिळण्याची आता नवी आशा निर्माण झाली आहे.
डॉ. आदित्य पतकराव हे अंबाजोगाई येथील रहिवासी असून सध्या ते पुणे येथे डॉ. आदित्य डेंटल केअर ऍन्ड रिसर्च सेंटर नावाचे मोठे रुग्णालयात चालवतात. दंत संशोधनात जागतिक पातळीवर त्यांनी अनेक संशैधन प्रबंध सादरकेले असून एक निष्णात वैद्यकीय दंत चिकित्सक म्हणून त्यांची जगभर ख्याती आहे. अनेक प्रदेशांना भेटी देऊन त्यांनी तेथील रेल्वे प्रशासनाचा ही अभ्यास केला आहे.
अंबाजोगाईचा सन्मान वाढवणारी नियुक्ती
डॉ. आदित्य पतकराव यांची रेल्वे मंत्रालयाने केलेली ही नियुक्ती अंबाजोगाई शहराचा सन्मान वाढवणारी निश्चितच आहे, सोबतच महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांच्या अडकलेल्या रेल्वे मार्गाला निश्चित गती देणारी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
सर्व स्तरातून होते आहे अभिनंदन!
डॉ. आदित्य पतकराव यांच्या या नियुक्ती नंतर महाराष्ट्रातील सर्व स्तरातुन डॉ. आदित्य पतकराव यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. राज्यातील उद्योजक, राजकारण आणि समाजकारण करणारे प्रतिनिधी सोबतच सर्वसामान्य स्तरातुनही त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रवासी सुविधा आणि स्टेशन विस्तार
यांना देणार प्राधान्य
डॉ. आदित्य पतकराव यांनी या नियुक्ती नंतर माध्यम न्यूज नेटवर्क शी बोलतांना आपण रेल्वे स्टेशन विस्तारीकरण आणि प्रवासी सुधारणा यांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. यासोबतच रेल्वे उपक्रमांना पर्यावरणाची सांगड घालत “ग्रीन परियोजना” माध्यमातून रेल्वेच्या कामांना गती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत असे त्यांनी सांगितले.
▪️परळी बीड नगर
रेल्वेमार्गाला देणार भेट
डॉ. आदित्य पतकराव यांनी आपल्या नियुक्ती बद्दल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रेल्वेमंत्री ना. पियूष गोयल, रेल्वे मंत्रालयाचे सचीव यांचे विशेष आभार मानले असून आपण लवकरच परळी बीड नगर या प्रलंबित रेल्वे मार्गाला भेट देणार असून या मार्गाच्या रखडलेल्या कामाला गती देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ही माध्यम न्यूज नेटवर्क शी बोलतांना सांगितले.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.