महाराष्ट्र
डॉ. आदित्य पतकराव यांची केंद्रीय दुरसंचार सल्लागार सदस्य पदी नियुक्ती


अंबाजोगाई चे भुमी पुत्र तथा पिंपरी चिंचवड (पुणे) येथील सुप्रसिध्द दंतचिकित्सक तसेच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डधारक डॉ. आदित्य पतकराव यांची नुकतीच भारत सरकारच्या केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाच्या सल्लागार समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
भारत सरकारच्या दुरसंचार मंत्रालयाचे विभाग अधिकारी एस. के. घोष यांनी या निवडीबाबतचे आदेश काढले आहेत. सदरील नियुक्ती बध्दल डॉ. आदित्य पतकराव यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.


आपल्या देशात आजही ४ जी आणि ५ जी सुविधा म्हणावी तितक्या स्पीडने चालत नाही. तसेच बऱ्याच ठिकाणी नेटवर्क पोहोचत नसल्यामुळे संपर्क गतिमान होत नाही. ग्रामीण भागात अजुनही नेटवर्कची समस्या आहे. यासारख्या अनेक प्रश्नांवर भविष्यात उपाययोजना करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे डॉ. आदित्य पतकराव यांनी या प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले.