टपाल व दुरसंचार विभागातील निवृत्त कर्मचाऱ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न
येथील टपाल व दुरसंचार विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मेळावा येथील टपाल कार्यालयात उत्साहात संपन्न झाला
यावेळी ऑल इंडिया सेन्ट्रल गव्हर्नमेंन्ट पेन्शनर्स असोशिएशनचे जनरल सेक्रेटरी एच.एफ.चौधरी,औरंगाबाद विभागाचे सचिव राम निंबाळकर, एम एम हन्नुरे,शेख अब्दुल शेख सत्तार,एच.जी.मते,संघटनेचे सचिव श्रीपाद चिक्षे,संघटक ए.जी.पसारकर,डी.आर.मुंडे,एस.के.कुडके,एस.जी.नागरगोजे, आदी उपस्थित होते.
एच. एफ. चौधरी म्हणाले की,सध्या ऐंशी वर्षे पुर्ण झालेल्या सेवानिवृत्तानां निवृत्ती वेतनात वीस टक्के वाढ मिळते ती ६५,७० आणि ७५ वर्षे पूर्ण झाल्यावर पाच टक्के,दहा टक्के आणि पंधरा टक्के मिळावी वैद्यकीय अनामत रूपये तीन हजारांपर्यंत वाढवून द्यावा अशी मागणी करण्यात आल्याचे सांगून सेवानिवृत्ती धारकांसाठी वेतन व्यवस्थापनासाठी काँम्प्रेसिव्ह पेन्शन मॅनेजमेंट सिस्टम ( संपन्न प्रणाली ) अंमलात आणली असून २०१९ पासून सेवानिवृत्त झालेल्यांना संपन्नव्दारे वेतन देण्यात येत असून ही प्रणाली उत्तमच असल्याचे ते म्हणाले टपाल आणि आणि दुरसंचार विभागातील विविध निवृत्ती धारकांचे प्रश्न पेन्शन अदालत मध्ये सोडवणुकीसाठी ठेवण्यात आल्याचे सांगून अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांनी विभागासाठी दिलेली सेवा अप्रतिम,अतुलनीय आपुलकी वाढविणारी असून विभागासाठी अखेर पर्यंत केलेले कार्य महत्त्वाचे असल्याचेही चौधरी म्हणाले.राम निंबाळकर यांनी सांगितले की पोस्टल पेन्शनर्स बाबतच्या सर्व अत्यावशक बाबींची शासनामार्फत सोडवणुक करून घेण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत ए जी पसारकर यांनी कर्मचाऱ्यांचे कोरोना काळातील वैद्यकीय खर्चाबाबतचे देयक देण्याबाबतची सूचना केली
पंच्याहत्तर,ऐंशी वर्षे पुर्ण झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यतत्पर सचिव श्रीपाद चिक्षे यांच्या उत्तम व्यवस्थापनातून हा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला टपाल आणि दुरसंचार विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.