महाराष्ट्र
ज्येष्ठ साहित्यिक, माजी कुलगुरू डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221130_170016.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221130_170016.jpg)
मराठी साहित्यसृष्टीत एक अक्षर नाममुद्रा कोरणारे सकस लेखक, समीक्षक, कवी व मराठी विषयाचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक व विभागप्रमुख, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष पदाने सन्मानित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कार्यक्षम व विकासाभिमुख कर्तबगार – दमदार कुलगुरू, समाज परिवर्तन चळवळींचे आधारस्तंभ, शेकडो विद्यार्थी व संशोधक सहकारी यांचे पाठीराखे, सडेतोड व निर्भयपणे मत मांडणारे विचारवंत, प्रागतिक चिंतनशीलतेचे प्रतिक प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे आज दुपारी दीड वाजता वेदनादायक निधन झाले. मराठवाड्यातील मागास अशा ग्रामीण भागातून पुढे आलेला स्वयंप्रभा, स्वयंप्रज्ञा धारक नि स्वयंप्रकाशित प्रतिभावान हरपला ! विनम्र आदरांजली ..!