ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला; पंकजा मुंडे यांनी केले बापट कुटुंबियांचे सांत्वन
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230329-WA0257-300x227.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230329-WA0257-300x227.jpg)
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज येथे दिवंगत ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी बापट कुटुंबियांचे सांत्वन केले.
खासदार गिरीश बापट काही दिवसांपासून आजारी होते. रूग्णालयात उपचार घेत असताना आज सकाळी त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंकजाताई मुंडे तातडीने पुण्याला रवाना झाल्या. दुपारी बापट यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रध्दांजली अर्पण केली.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230329-WA0258-300x225.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230329-WA0258-300x225.jpg)
आ. माधुरी मिसाळ यावेळी त्यांच्यासमवेत होत्या. बापट यांच्या निधनाने आमचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकिय आणि सर्व कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे अशा शब्दांत पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
••••