महाराष्ट्र
ज्येष्ठ नागरीकांची आ. नमिता मुंदडा यांनाच पसंती !

ज्येष्ठ नागरिकांची संख्या ४० टक्क्यांवर!
अंबाजोगाई शहरात वयाची साठी पार झालेल्या निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरीकांची संख्या लक्षणीय आहे.
हा मतदार अनुभवी, सुशिक्षीत व विचारपुर्वक मतदान करणारा आहे. साधारणतः ४० टक्के असणारा हा वर्ग नियमित आणि प्रामाणिकपणे मतदान करणारा वर्ग आहे. या निवडणुकीत हा वर्ग नेमका कोणाच्या मागे उभा राहणारा यांचा सर्व्हे केला असता त्यांनी आ. नमिता मुंदडा यांना पसंती दिली आहे.
आ. नमिता मुंदडा यांनाच का पसंती?

शहरातील विविध विभागात राहणा-या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधल्यावर त्यांचा कल पुढील प्रमाणे दिसला.
आ. सौ. नमिता मुंदडा या दिसताक्षणी नुसत्या सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कृतही असल्याचे प्रथमदर्शनीच कळते. त्यांची वर्तणूक, वागण्या बोलण्याची पद्धत, स्वभावातील नम्रता, ज्येष्ठांना सन्मानपूर्वक वागवण्याची पद्धत, या गोष्टी त्यांचे पारडे जड करून जातात. इतर राजकारण्याप्रमाणे त्यांच्या अवतीभवती उर्मट चेहऱ्याच्या कार्यकर्त्यांचा घोळका ही कधी दिसत नाही.
सुसंस्कृत आणि सुसंस्कारी!

याशिवाय त्यांच्यावर आधीच असलेले आणि नंतर त्यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा यांनी वर्धिष्णू केलेले सुसंस्कार उठून दिसतात. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांच्या मनातील अजून एक गोष्ट म्हणजे आ. नमिता मुंदडा यांना मत म्हणजे भाजपाला मत आणि केंद्रात व राज्यात दोन्हीकडे एकाच पक्षाचे सरकार असलेले राज्याच्या विकासाच्या दृष्टीने कधीही चांगलेच. असे ही ज्येष्ठ नागरिक सांगतात.
गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेतील सभासदांचा आ. नमिता मुंदडा यांच्याशी झालेल्या संवादातून ज्येष्ठांसाठी अनेक नवनवीन संकल्पना राबवण्याचा विचार आ. नमिता मुंदडा यांच्या मनात आहेत. त्या संकल्पना ज्येष्ठ नागरीकांना अधिक भावलेल्या दिसतात.
ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना राबविणार !

त्यापैकी काहींचा उल्लेख जो ज्येष्ठ नागरिकांनीच केला आहे. ज्येष्ठ नागरिकांनी भाजपा आणि मित्र पक्षाच्या उमेदवार आ. नमिता मुंदडा यांना मतदान का करावे? असा प्रश्न विचारला असता त्याची कारणे ज्येष्ठांच्याच बोलण्यातून कळाली,
ती अशी… भाजपा वरिष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना राबवणार आहे, ज्यात पेन्शन आणि आरोग्य सेवांचा समावेश आहे. आ. नमिता मुंदडा यांनी आरोग्यविषयक सेवांवर विशेष लक्ष देण्याचा संकल्प केला आहे, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना उत्तम वैद्यकीय सेवा मिळतील. त्यांनी वृद्धांसाठी समर्पित वृद्धाश्रम आणि देखभाल केंद्रे सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. वरिष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेवर विशेष भर देण्याचा संकल्प केला आहे, ज्यामुळे त्यांना सुरक्षित वातावरण मिळेल.

चोवीस तास आपत्कालीन सेवा!
वाचनालये आणि ज्येष्ठ नागरिकांना भेटण्यासाठी सांस्कृतिक केंद्रे उघडण्याच्या दृष्टीने त्यांनी योजना आखली आहे. नियमित मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे. आपत्कालीन सेवा – ज्येष्ठ नागरिकांसाठी चोवीस तास (२४×७) आपत्कालीन सेवा उपलब्ध करण्याचे आ. नमिता मुंदडा यांचे उद्दिष्ट आहे.
ज्येष्ठ नागरिकांना अधिक सुरक्षा देण्यासाठी विशेष योजना त्यांनी आखल्या आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ पर्यावरण निर्माण करण्यावर त्या भर देत आहेत. यात महिलांसाठी वॉकींग ट्रॅकचीही सोय असणार आहे.
