ज्ञानेश्वरराव काळदाते यांचा १६ जुलै रोजी अभिष्टचिंतन गौरव समारंभ
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/image_editor_output_image-263980763-1689050367839-292x300.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/image_editor_output_image-263980763-1689050367839-292x300.jpg)
कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन
केज तालुका आणि पंचक्रोशीतील शेकडो गावातील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर राव काळदाते यांच्या ९१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा अभिष्टचिंतन आणि गौरव सोहळ्याचे १६ जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे.
केज, अंबाजोगाई आणि पंचक्रोशीतील शेकडो गावातील विद्दार्थ्यांना निवासी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणारे या विभागातील शिक्षण महर्षी के. नारायण झाला काळदाते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहुन हा ज्ञानयज्ञ सतत चालू रहावा यासाठी ज्ञानेश्वरराव काळदाते यांनी मोलाचे काम केले आहे.
मानवलोक, नॅचरल शुगर च्या निर्मिती मध्ये मोठा सहभाग
या कामासाठी या विभागातील सामान्य शेतकरी आणि समाजातील सामान्य लोकांच्या उन्नतीसाठी आशादायी किरण ठरलेल्या अंबाजोगाई येथील मानवलोक आणि कळंब तालुक्यातील रांजणी येथील नॅचरल शुगर या उद्योग समुहाच्या उभारणी मध्ये ज्ञानेश्वरराव काळदाते त्यांचा मोठा वाटा आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/image_editor_output_image877144285-1689050410178-200x300.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/image_editor_output_image877144285-1689050410178-200x300.jpg)
९० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजन
ज्ञानेश्वरराव काळदाते यांनी या विभागातील पंचक्रोशीत केलेल्या कामाची दखल घेवून येत्या १६ जुलै रोजी त्यांच्या ९० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा अभिष्टचिंतन गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी न्या.मारल्लापल्ले सह मान्यवरांची उपस्थिती
मानवलोक येथील खुल्या सभागृहात १६ जुलै रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या अभिष्टचिंतन गौरव सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. एच. मारल्लापल्ले यांच्या शुभ हस्ते आणि धाराशिव जिल्ह्यातील केसेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अरविंदराव गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि लातुर पॅटर्न चे जनक प्राचार्य अनिरुद्ध जाधव व वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा होणार आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230711-WA0143-662x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230711-WA0143-662x1024.jpg)
उपस्थित राहण्याचे केले आवाहन
या कार्यक्रमास केज, अंबाजोगाई, कळंब तालुक्यातील शेकडो गावातील नागरिकांनी आणि ज्ञानेश्वरराव काळदाते यांना ओळखणा-या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक नॅचरल शुगर ऍण्ड अलिगड इंडस्ट्री चे संचालक इंजि. बी. बी. ठोंबरे, जी.जी. रआंदड, प्रा. एस. के. जोगदंड, भागवत दादा गोरे, प्राचार्य मधुकर गायकवाड, संभाजी रेड्डी, श्रीमती रजनी अंकुशराव काळदाते, मानवलोक चे कार्यवाह अनिकेत लोहिया, दगडु लोमटे, एस. बी. सैय्यद, डॉ. नरेंद्र काळे, इस्थळ चे सरपंच अविनाश भालेकर यांनी ज्ञानेश्वरराव काळदाते (मालक) गौरव समितीच्या वतीने केले आहे.