जुन्या पिढीला मिळालेला समृध्द वारसा नव्या पिढीला मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत; विनोद रापतवार
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/IMG_20220820_170732-1.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/IMG_20220820_170732-1.jpg)
अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
आजची पिढी घडविण्यासाठी त्यांना मिळालेला समृध्द वारसा उद्दाच्या पिढीला मिळवून देण्यासाठी अंबाजोगाईच्या बाहेर पोहोचलेल्या माणसांना करावा लागेल असे मत नांदेड जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी केले.
अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या “अंबाजोगाई चे अनिवासी पत्रकार” या सत्रात “अंबाजोगाई ची बाहेर पोहोचलेली माणसं” या संदर्भात विनोद रापतवार बोलत होते. या परिसंवादात एबीपी माझा चे जिल्हा प्रतिनिधी गोविंद शेळके, पीव्ही चे महाराष्ट्र हेड सतीश काटे, पुणे येथील पत्रकार-लेखक कलिम अजीम यांनी सहभाग घेतला तर संयोजन अमर हबीब यांनी केले.
आपल्या विस्तारीत निवेदनात विनोद रापतवार पुढे म्हणाले की, अंबाजोगाई ची माती ही संपन्न व गुणी वाणाला जन्म देणारी माती आहे. आजपर्यंत या शहरात जेवढ्या पिढ्या घडल्या त्या, त्या त्या काळात इतर लोकांनी घेतलेल्या निकोप काळजीमुळे. तेंव्हा उद्दाची पिढी घडविण्यासाठी आपल्याला मिळाला तेवढा समृध्द वारसा आपण त्यांना देवू शकु का? हा खरा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.
अंबाजोगाई शहरातुन बाहेर पोहंचलेली अनिवासी माणसं ही गावात घडणाऱ्या प्रत्येक बारीक गोष्टींवर लक्ष ठेवत असते. गाव पिढ्यानपिढ्या समृध्द होण्यासाठी नव्या पिढ्यांना आत्मविश्वासाच बळ देवून त्यांचा अधिवास समर्थ करण्याकरिता मुळ निवासी गाव ही तेवढंच भक्कम होत जाणं आवश्यक असतं. गाव समृद्ध होण्याची ही एक निरंतर प्रक्रिया असली पाहिजे. गावात बोलुन शकणा-या विव्दते समवेत शांतपणे ऐकून घेणारे कानही गावाच्या विकासासाठी आवश्यक असतात. आणि या दोन्हीच्या पलिकडे शांततेत आपले कर्तव्य समजून जसे जमेल तसे काम करणारे हात ही आवश्यक असतात.
असा लाभलेला समृध्द वारसा आजपर्यंतच्या पिढीने आपल्या पुढील पिढीला हा समृध्द वारसा टिकवुन ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत असे मत विनोद रापतवार यांनी व्यक्त केले.
या परिसंवादात एबीपी माझा चे जिल्हा प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी
“अंबाजोगाई परिसरातील शेती व शेतकरी” या विषयावर बोलताना अंबाजोगाई परीसरातील शेतकरी हा
संघर्ष करणारा, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपली पारंपारिक पीके टिकवून ठेवत प्रचंड, स्ट्रॉबेरी, रंगीत टरबुज, रेशीम शेती, ड्रॅगन फ्रुट व इतर व्यावसायिक शेती करीत संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील इतर शेतकऱ्यांना पथदर्शक नवा मार्ग दाखवणारा, पाणी फाऊंडेशन च्या माध्यमातून उजाड माळरानावर बागायत पीके घेऊन विकास करु पहाणारा शेतकरी असल्याचे त्यांनी सांगितले.
या परिसंवादात “अंबाजोगाई पत्रकारांचे स्थलांतर” या विषयावर पुणे येथे पत्रकारीता करणा-या कलिम अजिम यांनी शिक्षण व नौकरी करण्यासाठी कराव्या लागलेल्या स्थलांतराचा धांडोळा घेतला.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पुर्ण करुन औरंगाबाद येथे पत्रकारीतेत चे शिक्षण व पुढे पुणे-मुब इ आणि परत पुणे असा प्रवास, या प्रवासात नौकरी निमित्ताने बदलत जाणा-या कामासहीत गावाचे करावे लागलेले स्थलांतर याबद्दल ची माहिती.
मुंबई पुणे सारख्या शहरात केवळ मराठवाडी ज्येष्ठ सहका-यांकडुन डावलत चालल्याची सतत भावना वाढीस लागते आणि ब-याच वेळेस नैराश्य येते असा वैयक्तिक आणि सार्वजनिक अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्यातील पत्रकारांना आपलं स्थान टिकविण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो, ही स्पर्धा खुप अघोरी स्पर्धा आहे. या स्पर्धेत टिकून त्यावर मात करीत आपण आज एक
उत्तम संवेदक, पट्टीचा वाचक, दमदार साहित्यिक, लालित्य पुर्ण लेखन करु शकतो. वैचारिक अंगाने लिहु शकतो. स्थलांतरावर आठ ते दहा लेख आपण लिहिले असून हे सर्व लेख वाचकांच्या पसंतीस उतरले .
असल्यामुळे या क्षेत्रात आपण पुर्ण समाधानी आहेत असे त्यांनी सांगितले.
या परिसंवादात “इतर शहरांच्या तुलनेत अंबाजोगाई” या विषयावर बोलताना ईटीव्ही चे महाराष्ट्र हेड सचीन काटे यांनी लोकसहभागातून सुरु असलेल्या साहित्य संमेलनाची ओळख निर्माण झाल्याचे सांगत संयोजकांचे कौतुक केले. अंबाजोगाई शहर हे एक वैशिष्ट्य पुर्ण शहर आहे असे सांगून शिक्षणामुळे अंबाजोगाईत अनेक लोक आले आणि ते अंबाजोगाईलाच कर्मभूमी मानू लागले. अंबाजोगाई शहरात हशिक्षण घेण्यासाठी येवून शिक्षणानंतर ही त्यांनी अंबाजोगाई शहराचे नाव वाढविण्याचा, जपण्याचा प्रयत्न केला असे सांगितले. अंबाजोगाई शहर हे
भावनिक गुंतागुंतीला महत्व देणारे शहर असल्याचे सांगत सतीश काटे यांनी या शहराचे वैभव जपण्यासाठी आणि वाढवण्यासाठी अनिवासी अंबाजोगाई करांनी प्रयत्न केले पाहिजेत असे सांगितले.
या कार्यक्रमाचे सुरेख संयोजन अमर हबीब यांनी केले तर आभार पत्रकार अविनाश मुडेगावकर यांनी मानले.