महाराष्ट्र
जुनी पेन्शन योजना; शासकीय कर्मचाऱ्यांचा संप ७ दिवसांनंतर मागे


जुनी पेन्शन सुरू करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी गेल्या सात दिवसांपासून संप पुकारला होता. हा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. राज्य सरकारसोबत बैठक झाल्यानंतर हा संप मागे घेण्यात येत असल्याचा निर्णय कर्मचारी संघटनेने घेतला आहे. या प्रश्नावर सरकारने तीन महिन्यांमध्ये तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे, असेही कर्मचारी संघटनांनी म्हटले आहे.
सरकारने आश्वासनांचे गाजर न दाखवता सरसकट ‘जुनी पेन्शन योजना’ लागू करावी, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्या सरकारी कर्मचाऱ्यांची होती. मात्र सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यानंतर संपात सहभागी असणाऱ्या कर्मचारी व अधिकारी संघटनांनी अखेर संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.