जागतिक -हदय दिनी डॉ. नवनाथ घुगे साधणार “संवाद -हदय रोगाशी”
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG_20230927_233224-291x300.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG_20230927_233224-291x300.jpg)
-हदय रुग्णांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
१ ऑक्टोबर रोजी जागतिक -हदय रोग दिनाचे औचित्य साधत रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी आणि घुगे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रख्यात -हदयरोग तज्ञ डॉ. नवनाथ घुगे हे आपल्या प्रगट मुलाखतीत -हदय रोगाशी संवाद साधणार असून या कार्यक्रमाचा लाभ -हदयरुग्णांनी आवश्य घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब आणि घुगे हॉस्पिटल यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अंबाजोगाई येथील नगर परिषदेच्या आद्दकवी मुकुंदराज स्वामी सांस्कृतिक सभागृहात हा प्रगट मुलाखतीचा कार्यक्रम १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता सुरू होणार आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG_20230927_233329-881x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG_20230927_233329-881x1024.jpg)
सध्याच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात आपले आरोग्याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत चालले आहे त्याचा परिणाम तातडीने मानवी शरीरावर आणि अंतर्गत स्वरुपात होत आहे. ह्दयरोग असामान्य रोग बनला आहे ज्याचा परिणाम आता कुठल्याही वयोगटावर होत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे शरीरातील अंतर्गत हालचाली किंवा बदल हे तातडीने होवून त्याचा परिणाम थेट जीव जाण्यापर्यंत होत आहे. अंबाजोगाई शहरात गेल्या दोन महिन्यात अनेक तरुण कार्यकर्ते आणि सहकारी हे अल्पशा वयात ह्दयरोगामुळे जग सोडून गेले आहेत.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG_20230927_233240-1024x641.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG_20230927_233240-1024x641.jpg)
ह्दय रोगाची चिंता ही सतावणारी असल्याने या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी किंवा त्यावरील उपचारासाठी आणि प्राथमिक माहिती प्राप्त व्हावी आणि अनेकांचे जीव वाचवेत यासाठी रोटरी क्लब व घुगे हॉस्पिटल अंबाजोगाईने पुढाकार घेतला असून जागतिक ह्दयरोग दिनाच्या निमित्ताने रविवार दि. 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह अंबाजोगाई येथे संवाद ह्दयरोगाशी हा अभिनव कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमात अंबाजोगाईतील प्रसिद्ध ह्दयरोग आणि मधुमेह तज्ञ डॉ.नवनाथ घुगे हे हार्ट अॅटॅक, अचानक होणारे मृत्यू व त्यांचे कारणे आणि उपाय व अपतकालीन परिस्थितीमध्ये करावयाचे उपचार यावर ते सखोल मार्गदर्शन करणार आहेत.
डॉ.नवनाथ घुगे यांची मुलाखत प्रा.अमृत महाजन हे घेणार आहेत तरी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी आणि घुगे हॉस्पिटल अंबाजोगाई यांच्या वतीने करण्यात आले आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG_20230927_232534-704x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG_20230927_232534-704x1024.jpg)
सध्याच्या काळात मानवी शरीर हे सुरक्षित राहिलेले नाही. कारण पाश्चिमात्य सांस्कृतिचा मारा त्यासोबतच आहारातील बदल आणि केमिकलयुक्त अन्नपदार्थ यामुळे शरीरावर त्याचा मारा मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु ही गरज असल्याकारणाने अनेक आजार व अनेक हालचाली आणि बदल शरीरात अंतर्गत स्वरुपात होत असतात. आपण आपल्या शरीराकडे पूर्णतः दुर्लक्ष करतो कारण आपल्यासमोर आपल्या दैनंदिन कामाचे ध्येय किंवा ध्यास असतो. म्हणून शरीराकडे दुर्लक्ष होते. किंवा मला काय होणार या अर्विभावामुळे शरीराकडे दुर्लक्ष होते आणि शरीरातील कोलोस्ट्रोल वाढल्यामुळे किंवा इतर चरबी वाढल्यामुळे त्याचा मारा शरीरातील ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यावर होतो. ज्यादिवशी रक्तवाहिन्या ब्लॉक होतात त्या दिवशी ह्दयविकाराचा झटका येतो मग तो कधी सौम्य प्रकाराचा किंवा मोठ्या प्रमाणातील असतो. सौम्य प्रकारामुळे उपचार करणे सुलभ जाते. परंतु मोठ्या प्रमाणातील आलेल्या झटका हा मानवी जीवावर बेततो. आता ह्दय विकार होण्याचे वय निश्चित राहिलेले नाही तीस वर्षापूर्वी ह्यविकाराचा झटका हा साधारणतः 50 ते 60 वर्षाच्या व्यक्तीला होत होता. परंतु आता त्याचे वय राहिले नाही. तरुणांमध्ये याचे प्रमाण वाढले आहे. त्याची वेगवेगळी कारणे आहेत.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG_20230927_232519-835x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG_20230927_232519-835x1024.jpg)
आहार विहार, व्यायाम न करणे, तसेच शरीराकडे दुर्लक्ष करणे यामुळे तरुणांमध्ये ह्यविकाराचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन महिन्यात अंबाजोगाईतील अनेक होतकरु तरुण आणि व्यक्ती आपल्यातून काही कळण्याआत निघून गेल्या. ही चिंताजनक बाब आहे. त्यानुषंगाने हे प्रमाण कमी करण्यासाठी किंवा त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी आणि घुगे हॉस्पिटल अंबाजोगाई यांच्य संयुक्त विद्यमाने जागतिक ह्दयरोग दिनाच्या निमित्ताने संवाद ह्दयरोगाशी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रा.अमृत महाजन हे डॉ. नवनाथ घुगे यांची मुलाखत घेवून वेगवेगळे प्रश्न आणि प्रत्येकाच्या मनातील शंकेचे निरसन आणि मार्गदर्शन करणार आहेत.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG_20230927_233302-833x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG_20230927_233302-833x1024.jpg)
हा कार्यक्रम रविवार दि. 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह अंबाजोगाई येथे आयोजित केला आहे. तसेच दि. 1 व 2 ऑक्टोबर रोजी मोफत रक्त तपासणी केली जाणार आहे. ज्यामध्ये शुगर आणि लिपिड प्रोफाईल टोटल कोलेस्ट्रोलचा समावेश आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सर्व वयोमानातील तरुण, तरुणी, नागरिक बंधू भगिनींना घ्यावा असे आवाहन रोटरीचे अध्यक्ष स्वप्नील परदेशी, सचिव गणेश राऊत, डॉ.बालासाहेब लोमटे आणि घुगे हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.