जरांगे पाटील यांच्या सभेमुळे १४ ऑक्टोबर रोजी वाहतुक मार्गात बदल


सहकार्य करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचे आवाहन
14 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षण संदर्भात आंतरवाली जिल्हा जालना येथे मोहन जरांगे यांच्या जाहीर सभेसाठी होणा-या संभाव्य गर्दीत धुळे सोलापुर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 152 वरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी या महामार्गावरील वाहतूक महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 च्या अधिकारांचे पालन करुन या महामार्गावरील दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 08:00 ते रात्री 20:00 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतूक मार्गात (सभेसाठी जाणारी वाहने, बंदोबस्तासाठीची वाहने, ऍम्ब्बुलन्स, अग्निशमन दलाची वाहने वगळून) बीड जिल्हा पोलिस प्रमुखांनी बदल केला आहे. या बदलाची नोंद नागरिकांनी घेवून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख नंदकुमार ठाकूर यांनी केले आहे.


या संदर्भात जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या कार्यालयातील 11 ऑक्टोबर रोजी एक प्रसिद्ध पत्र जारी करण्यात आले असून सदरील पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, ज्या अथी आमचे असे निदर्शनास आले आहे की, श्री मनोज जरांगे पाटील रा. अंकुश नगर, महाकाळा ता. अंबड जि. जालना व इतर यांनी दिनांक 14/10/2023 रोजी मराठा समाजातील लोकांसोबत संबोधन सभेचे आयोजन केले आहे. सदर मराठा समाजातील संबोधन सभेसाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणावरुन सुमारे 5 ते 6 लाख लोक येण्याची शक्यता असून सदर सभा ही मौजे अंतरवली सराटी येथिल रामगव्हाण रोडवरील 100 एक्कर जागेवर धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर होणार आहे. सभेसाठी सुमारे 30,000 ते 35,000 वाहने येण्याची शक्यता आहे. सदर सभेस मोठ्या प्रमाणात नागरीक आपआपली
वाहने घेऊन येणार असल्याने वाहतूक कोंडी होऊन जनतेच्या सुरक्षीततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहन चालकांमध्ये किरकोळ बाबीवरुन वाद विवादाची परस्थिती निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


तरी नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धुळे-सोलपुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक
152 वरील वाहतुक पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक आहे.
अ क्र. 1) सध्या वापरात असलेला मार्ग बीड-गेवराई- छ. संभाजीनगर
पर्यायी मार्ग
बीड-पाडळसिंगी मादळमोही खरवंडी- पाथडी-शेवगांव. पैठण. छत्रपती संभाजीनगर
किंवा
बीड- पाडळसिंगी खरवंडी- पैठण. छ. संभाजीनगर बीड-गढी- माजलगांव- आष्टी घनसांगवी अंबड- जालना
अ.क्र. 2)


बीड-गेवराई-जालना
बीड-गेवराई शहागड अंकुशनगर- छ. संभाजीनगर, व बीड-गेवराई- जालना-या मार्गावरील सर्व वाहतुक (सभेसाठी जाणारी वाहने, बंदोबस्तातील वाहने, अॅम्बुलन्स, अग्नीशामक दलाची वाहने वगळून) ही दिनांक 14/10/2023 रोजीचे सकाळी • 08:00 ते रात्री 20:00 वा पर्यंत सर्व प्रकारची वाहतुक वरील मार्गाने वळविण्यात येणार आहे. याची सर्व वाहन चालक/मालक यांनी नोंद घ्यावी.
सदरचा आदेश मी नंदकुमार ठाकूर पोलीस अधीक्षक, बीड माझ्या सही शिक्यानिशी दिनांक 11/10/2023 रोजी प्रसिध्द करण्यात आली.


सदरील आदेशाच्या प्रति योग्य त्या कार्यवाहीस्तव
1) सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, बीड जिल्हा
2) सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, बीड जिल्हा
(नंदकुमार ठाकूर) पोलीस अधीक्षक, बीड
3) प्रभारी अधिकारी वाहतुक महामार्ग पोलीस मदत केंद्र मांजरसुवा गढी प्रत आणि योग्य त्या माहितीस्तव:-
मा. जिल्हाधिकारी, बीड,
मा. पोलीस अधीक्षक जालना,
मा. पोलीस अधीक्षक, छ. संभाजीनगर ग्रामिण,
मा. पोलीस अधीक्षक महामार्ग, छ. संभाजीनगर,
मा. पोलीस. अधीक्षक, अहमदनगर,
आणि
प्रसिध्दीस्तवः सर्व स्थानिक वर्तमान पत्र, बीड यांना देण्यात आलेल्या आहेत.