जमिनीच्या वादातून अंबाजोगाईत खुन
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230209-WA0211-1024x1015.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230209-WA0211-1024x1015.jpg)
अंबाजोगाई शहरातील रविवार पेठ भागात एका तरुणाचा धारदार शस्त्रांनी वार करून आणि दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही थरारक घटना आज गुरुवारी (दि.०९) सायंकाळी ६ वाजता घडली. नयूम अली चाऊस उर्फ बिल्डर (वय ३७, रा. रविवार पेठ, अंबाजोगाई) असे मयत तरुणाचे नाव आहे. जमिनीच्या वादातून हा खून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अंदाजे ५ ते ६ हल्लेखोरांनी बोलण्याच्या बहाण्याने नयूम यास घराबाहेर बोलावून घेतले. त्यानंतर बोलण्यात गुंतवून ठेऊन हल्लेखोरांनी फायटर, तीक्ष्ण हत्याराने आणि दगडाने नयूमवर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नयूमचा जागेवर मृत्यू झाला. या घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळातून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक विनोद घोळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि यू यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवून दिला. दरम्यान, हल्लेखोर परळी येथील • असून जमिनीच्या वादातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शहर पोलीस पुढील तपास करत असून अद्याप या प्रकरणी कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.