छत्रपती शिवाजी महाराज १७ व्या शतकातील एकमेव चारीत्र्यवान राजा
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230219-WA0152-1024x682.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230219-WA0152-1024x682.jpg)
प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे यांचे मत
कृषि महाविद्यालय, लातूर येथे दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी ३९३ व्या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवरायांच्या मूर्तीची पालखी मिरवणूक महाविद्यालयात काढण्यात आली. ह्या कार्यक्रमाप्रसंगी वृक्षारोपण आणि प्रतिमा पुजन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे तर प्रमुख अतिथी म्हणून ख्यातनाम इतिहासकार डॉ. सोमनाथ रोडे , डॉ. दिनेशसिंह चौहान, डॉ. प्रशांत करंजीकर, डॉ. ज्योती देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230219-WA0151-1024x682.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230219-WA0151-1024x682.jpg)
सोहळ्याप्रसंगी बोलताना प्रमुख वक्ते डॉ. सोमनाथ रोडे यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी इत्यंभूत माहिती दिली. ते पुढे बोलताना म्हणाले की शिवाजी महाराजांच्या यशाचे गमक म्हणजे त्यांचे शुद्ध चरित्र , प्रबळ गुप्तहेर खाते, महाराजांना असलेलं उत्तम भौगोलिक ज्ञान आणि गनिमी कावा युद्ध पद्धती. महापुरुष तो असतो जो शून्यवत अवस्थेतून पुढे जातो. अध्यक्षीय समारोपात बोलताना डॉ. ठोंबरे म्हणाले की शिवचरित्रातून तरुणांना स्फूर्ती मिळते व तरुणांनी यातून बोध घेऊन आयुष्यात निश्चित ध्येय प्राप्त करावे. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिमखाना उपाध्यक्ष डॉ. ज्योती देशमुख यांनी केले.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230219-WA0150-1024x682.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230219-WA0150-1024x682.jpg)
शिवजन्मोत्सव क्रीडा व सांस्कृतिक सप्ताहात आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रशांत करंजीकर यांनी करुन दिला. याप्रसंगी विद्यार्थी ज्योती माखने व शुभम फाटक यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थिनी ऋतुजा जोशी हिने गीत गायन केले आणि सूत्रसंचालन समर्थ तुपकर याने केले. तर आभार डॉ. दयानंद मोरे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.