चेतना शेखर तिडके यांनी अपर पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्विकारला!
अंबाजोगाई येथील नवीन अपर पोलीस अधीक्षक म्हणून चेतना शेखर तिडके यांनी आज आपला पदभार स्विकारला.
येथील अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार यांची मागील महिन्यात सायबर पोलीस अधीक्षक मुंबई येथे बदली झाली होती. त्यांच्या जागी केज येथील प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलिस अधिकारी पंकज कुमावत यांची बदली करण्यात आली होती. सदरील बदली आदेशाचे नंतर लगोलग करण्यात आलेल्या राजकीय हस्तक्षेपानंतर पंकज कुमावत यांनी अंबाजोगाई येथील अपर पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारता येवू नये म्हणून मुलींच्या शैक्षणिक कारणास्तव कविता नेरकर यांची बदली रद्द करुन पंकज कुमावत यांची इतरत्र बदली करण्यात आली होती.
सदरील स्थगिती आदेशानंतर महिना भरातच पुन्हा कविता नेरकर यांच्या जागी नागपूर येथील पोलीस उपायुक्त चेतना शेखर तिडके यांची आंबाजोगाई येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून बदली आदेश निघाले होते.
सदरील आदेशान्वये आज दर्शन वेळ आमवस्सेच्या मुहुर्तावर चेतना शेखर तिडके यांनी कविता नेरकर यांच्या कडुन आपला पदभार स्वीकारला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन वर्षांपर्यंत किंवा त्याआधीच कमीजास्त कालावधी पुर्ण केलेल्या वरीष्ठ पोलीस अधिका-यांच्या बदल्या राज्यात करण्यात आल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर ही बदली करण्यात आल्याची माहिती आहे.चेतना शेखर तिडके यांच्या पुढच्या उज्वल कारकीर्दीसाठी लोकप्रभा परिवाराच्या वतीने शुभेच्छा.