चीन ने वाढवली इतर देशांची चिंता 20 दिवसात 25 कोटी लोकांना लागण !


चीनमध्ये वाढता कोरोना पाहता, इतर देशांची चिंता देखील वाढली आहे. अशातच आता वैज्ञानिकांनी नवीन संसर्ग कोरोना व्हायरसच्या म्यूटेशनसाठी (Coronavirus Mutation) मदत करू शकतो, ज्यामुळे व्हायरसचं नव रूपं दिसून येऊ शकतं. चीनमध्ये (Covid in china) कोरोनाच्या कारणाने परिस्थिती बिकट आहे. समोर आलेल्या आकड्यांनुसार, चीनमध्ये BF . 7 व्हेरिएंट (Corona Varient) थैमान घालतोय, ज्यामुळे दररोज लाखो कोरोनाची प्रकरणं समोर येतायत. चीनमध्ये वाढता कोरोना पाहता, इतर देशांची चिंता देखील वाढली आहे. अशातच आता वैज्ञानिकांनी नवीन संसर्ग कोरोना व्हायरच्या म्यूटेशनसाठी (Coronavirus Mutation) मदत करू शकतो, ज्यामुळे व्हायरसचं नव रूपं दिसून येऊ शकतं.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे नवं म्युटेशन अधिक धोकादायक असू शकतं. जर व्हायरसचं म्युटेशन झालं तर आणखी विनाश होण्याचा इशारा देखील तज्ज्ञांनी दिला आहे.
अजूनही धोकादायक व्हेरीएंट येऊ शकतो


जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटीच्या इन्फेक्शन डिसीज एक्सपर्ट डॉ. स्टुअर्ट कैंपबेल रे (Dr. Stuart Campbell Ray) यांनी सांगितलं की, कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन व्हेरिएंटसारखाच असू शकतो. चीनची लोकसंख्या खूप मोठी असू शकते, त्यामुळे खूप कमी लोकांमध्ये कोरोनाविरोधात इम्युनिटी तयार होऊ शकते. अशा परिस्थितीत नवा व्हेरिएंट येण्याचा धोका होऊ शकतो.
प्रत्येक नवं इन्फेक्शन कोरोनाला म्युटेशनसाठी नवी संधी देतं. चीनची लोकसंख्या 1.4 अब्ज आहे. त्यामुळे या ठिकाणी कोरोना अजून वेगाने पसरू शकतो. याठिकाणी झिरो-कोविड पॉलिसी जवळपास संपली आहे. जर चीनमध्ये लोकांची इम्युनिटी कमी झाली तर व्हायरल म्युटेट होण्यास अधिक मदत मिळणार आहे, असं डॉ. स्टुअर्ट यांनी सांगितलंय.
डॉ. स्टुअर्ट यांनी पुढे सांगितलंय की, जगाच्या अनेक भागांमध्ये गेल्या सहा ते बारा महिन्यांमध्ये कोरोनाचा परिणाम सौम्य झाल्याचं दिसतंय. व्हायरस या पूर्वीपेक्षा कमी धोकादायक होता अशी गोष्ट नाही.
२० दिवसात २५ कोटी लोकांना लागण!
अवघ्या 20 दिवसांत चीनमध्ये 250 दशलक्षाहून अधिक (25 कोटी) लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाच्या 20 मिनिटांच्या बैठकीतून ही माहिती लीक झाली आहे. 1 ते 20 डिसेंबर दरम्यान, 24.8 कोटी लोकांना कोविडची लागण झाल्याचेही बैठकीच्या लीक झालेल्या कागदपत्रांमधून उघड झाले आहे. रेडिओ फ्री एशियानुसार, 20 डिसेंबर रोजी सरकारी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या कोविड प्रकरणांची संख्या वास्तवापेक्षा वेगळी होती.
भारतातही वाढतोय नवा व्हेरीएंट
– चीनमध्ये कोरोनाने (corona) पुन्हा हाहाकार माजवला असून तेथे हजारो लोक रुग्णालयात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतासह जगातील सर्व देशहाय अलर्टवर असून भारतात सर्व राज्यांना अलर्ट रहायची सूचना केंद्र सरकारने दिली आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयानेही तातडीची बैठक बोलावून काही नवे नियम (new guidelines) जारी केले आहेत. चीनमध्ये कोविडची प्रकरणे वाढण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या ओमिक्रॉनचा बीएफ.7 (BF.7 variant of Omicron) हा नवा व्हेरिएंट समोर आला आहे.
कोरोना व्हायरल सतत म्यूटेट (उत्परिवर्तन) होत असून त्यामुळे त्याच्या लक्षणातही बदल होत आहे. अशी अनेक प्रकरणेही समोर आली आहेत ज्यात लसीकरण झालेले लोक देखील कोविड पॉझिटिव्ह होत आहेत. खरंतर काही लक्षणे अशी आहेत ज्यांच्याकडे आपण सामान्य लक्षणे समजून दुर्लक्ष करतो, मात्र ते कोरोनाचेही लक्षण असू शकते.
लक्षणे कोणती ते जाणून घ्या


– गळ्यात खवखव होणे
– शिंका येणे
– सर्दीमुळे वाहते नाक
– सर्दीमुळे नाक बंद होणे
– कफ नसलेला (कोरडा) खोकला
– डोकेदुखी
– कफयुक्त खोकला
– बोलण्यास त्रास होणे
– स्नायूंमध्ये वेदना होणे
– वास / गंध न येणे
– जास्त ताप येणे
– थंडी वाजून, हुडहुडी भरून ताप येणे
– सतत खोकला येणे
– थकवा वाटणे
– भूक कमी लागणे
यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांना दाखवावे व गरज पडल्यास चाचणी करून घ्यावी.
खुप सामान्य लक्षणे
एका अभ्यासानुसार, गंध अथवा वास न येणे तसेच धाप लागणे ही कोविड-19 च्या BF-7 व्हेरिएंटची सामान्य लक्षणे आहेत. कोरोनाच्या इतर प्रकारांमध्येही हे सर्वात सामान्य लक्षण होते.


लक्षणे दिसल्यास काय करावे?
नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार, बऱ्याच लोकांना संसर्ग झाल्यावर पाच दिवसांनीही इतरांना संसर्ग होत नाही तर काही लोक असे असतात जे संसर्ग झाल्यानंतर 10 दिवसांपर्यंत संसर्ग (इतरांमध्ये) पसरवू शकतात. त्यामुळे ज्यांना या आजाराशी संबंधित कोणतीही लक्षणे दिसतील त्यांनी त्याकडे दुर्लक्ष न करता त्यांनी पाच दिवस इतर लोकांच्या संपर्कात येणे टाळावे आणि किमान 10 दिवस वृद्ध-मुले किंवा आजारी व्यक्तींना भेटणे टाळावे. तसेच वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत.