चांगला माणूस बनण्यासाठी बालझुंबड सारखे उपक्रम आवश्यक; गोविंद शेळके
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे खुले व्यासपीठ बालझुंबड-२०२३ चा शानदार शुभारंभआजच्या काळात माणूस बनण्यासाठी बालझुंबड सारखे उपक्रम होणे हे अत्यावश्यक असल्याचे मत एबीपी माझा या व्रत वाहिनीचे व्रत निवेदक गोविंद शेळके यांनी व्यक्त केले. ते प्रियदर्शन क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने सलग २३व्या वर्षी आयोजित बालझुंबड-२०२३ च्या उदघाटन समारंभात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पोतदार स्कुलचे प्राचार्य किर्तीकुमार देशमुख, प्रदीप कांदे, कु. ऋचा कुलकर्णी तसेच न्यू व्हिजन पब्लिक स्कुलचे प्राचार्य प्रवीण शेळके , फार्मसी कॉलेज चे मृणाल सिरसाट , डॉ नंदकुमार फुलारी, संयोजक तथा मंडळाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख दिनकर जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
बालझुंबड-२०२३या सांस्कृतिक उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी प्रथमतः साने गुरुजीं यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण व दीपप्रज्वलन करण्यात आले. या उपक्रमाची प्रस्तावना राजेश कांबळे यांनी केली. आपल्या प्रस्तावनेत राजेश कांबळे यांनी प्रियदर्शनी क्रीडा , सांस्कृतिक मंडळ तथा बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी अंबाजोगाई तालुक्यातील शाळा व विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या बालझुंबड या उपक्रमाविषयीची संकल्पना स्पष्ट केली. अंबाजोगाई पंचक्रोशी तसेच ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असलेले कलागुण सादर करण्यासाठी एक नवीन व्यासपीठ उपलब्ध करून दिले . यावर्षी बालझुंबड या उपक्रमाचे तेवीसावे वर्ष असून प्रत्येक वर्षी ७००० ते ८०००विध्यार्थी आपला सहभाग नोंदवून कलाविष्कार सादर करत असल्याचे राजेश कांबळे यांनी आपल्या प्रस्तावनेत सांगितले . राजकिशोर मोदी यांनी सुरू केलेला बालझुंबड हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी एक आनंदोत्सव ठरल्या जात असल्याचे देखील कांबळे हे यावेळी म्हणाले.
यावेळी शालेय तथा बालझुंबड ची माजी विद्यर्थिनी कु. ऋचा कुलकर्णी हिने देखील आपले विचार व्यक्त केले. कुठल्याही स्पर्धेत केवळ बक्षीस मिळवणे हा उद्देश समोर न ठेवता स्पर्धेत सहभागी होणे हे महत्त्वाचे असल्याचे कु. ऋचा कुलकर्णी हिने सांगितले. तसेच माझ्या यशात बालझुंबडचा सिंहाचा वाटा असून बालझुंबड च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा प्रयत्न संयोजकांच्या वतीने करण्यात येत असतो. विद्यार्थ्यांनी कोणत्याही स्पर्धेकडे एक संधी म्हणून पाहण्याचे आवाहन कु ऋचा कुलकर्णी हिने केले. याप्रसंगी पोतदार स्कुलचे प्राचार्य किर्तीकुमार देशमुख यांनी बालझुंबड मधील सहभागी विद्यार्थ्यांना भविष्य असल्याचे परखड मत व्यक्त केले. मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी तालुक्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना एक आपल्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मोदी यांचे आभार आणि अभिनंदन केले. या ठिकाणी प्राचार्य प्रवीण शेळके यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.
बालझुंबड -२०२३ च्या शुभारंभ प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात एबीपी माझा चे व्रत निवेदक गोविंद शेळके यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच व्यक्तिमत्त्व विकास होणे आवश्यक आहे .चांगला माणूस बनण्यासाठी बालझुंबड सारखे उपक्रम होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट मत गोविंद शेळके यांनी मांडले. मागिल २३वर्षे बालझुंबड या उपक्रम सातत्याने चालू ठेवल्याबद्दल संयोजक राजकिशोर मोदी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. विज्ञानाच्या व स्पर्धेच्या या युगात विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्पर्धेत सहभागी व्हावे तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी व योग्य ठिकाणीच करावा असे आवाहन देखील शेळके यांनी यावेळी केले.
आजच्या शुभारंभ दिवशी पीपीटी स्पर्धेत ५ वी ते ७वी गटात ७५ संघ तर ८ वी ते १० वी या गटात ४० संघांनी सहभाग घेतला होता. बालझुंबड च्या शुभारंभ प्रसंगी जोधाप्रसादजी मोदी विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रकांत गायकवाड, विनायक मुंजे, पत्रकार ज्ञानेश मातेकर यांच्यासह अनेक शाळांतील शिक्षक ,विद्यार्थी व पालक उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद शिंदे यांनी तर आभार आनंद टाकळकर यानी व्यक्त केले.