चप्पल घेतली नाही म्हणून १० वर्षीय चिमुरड्याने घेतला गळफास!


आई वडील ऊसतोडीस गेल्यामुळे बोडखा (का) ता. धारूर जि. बीड येथील चि. युवराज त्याच्या आजीकडे रहात असलेल्या या दहा वर्षाच्या त्याच्या आजीकडे चप्पलची मागणी केली. सदरील मागणी आजीला पुर्ण करता आली नसल्यामुळे १० वर्षाच्या चिमुरड्याने साडीच्या साहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची -हदयद्रावक घटना धारुर तालुक्यात घडली.
आई वडील ऊसतोडणी साठी गेलेले असताना आजीकडे राहणा-या १० वर्षीय चिमुरड्याने आपल्या आजीकडे चपलेसाठी हट्ट धरलाय मात्र दोन घासाची भ्रांत असलेल्या वयोवृद्ध आजीने चप्पल घेण्यास नकार दिला म्हणून रागाच्या भरात साडीने गळफास घेऊन त्याने जीवनयात्रा संपवली.
१० वर्षीय या चिमुरड्याच्या आत्महत्येने ऊसतोड कामगारांच्या कुटुंबाची ही वाताहात कधी थांबेल ? असा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.
ऊस तोड कामगारांच्या मुलांचे मृत्यू अनेकवेळा कधी विंचू-साप चावून… कधी विहिरीत पाय घसरून… कधी कोपीला आग लागून… कधी गाडीच्या चाकाखाली तर कधी उसाच्या फडात अशा एका चढ एक हृदय द्रावक घटना घडल्याचे आपण सतत वाचत पहात असतो. याचे कोणासही सोयर सुतक नसते. अशा घटना वाचनात आल्या की मेंदुला मुंग्या आणतात मात्र कालांतराने आपण हे सर्व सोईस्करपणे विसरतो.
सदरील चिमुरड्याने आत्महत्या केली त्याच दिवशी बीडचे जिल्हाधिकारी श्री. राधा बिनोद शर्मा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ऊसतोड कामगारांच्या शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणावर वढाय बैठक आयोजित केली होती. मी
ऊसतोड मजूरांच्या शाळाबाह्य शिक्षणासोबतच त्यांच्या जगण्या मरण्याच्या कारणांचाही विचार व्हायला हवा.