घरकाम करणाऱ्या महिलांसाठी मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबीर; ४०० महिलांची तपासणी
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230312-WA0062-1024x576.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230312-WA0062-1024x576.jpg)
इंडीयन मेडीकल असोसिएशन अंबाजोगाई, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय सर्जरी विभाग व मानवलोक यांच्या संयुक्त विद्यमाने घरकाम करणाऱ्या महीलांचे सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 10 मार्च रोजी मानवलोक जनसहयोग कार्यालय येथे करण्यात आले होते.या शिबीरात एकुण ४०० महिलांची सर्वंकष मोफत आरोग्य तपासणी , स्तन कर्करोग समुपदेशन व औषध ऊपचार करण्यात आले.
डॉ. नवनाथ घुगे यांची संकल्पना
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230312-WA0065-1024x576.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230312-WA0065-1024x576.jpg)
आयएमए चे नवनियुक्त अध्यक्ष डॉ.नवनाथ घुगे यांच्या संकल्पनेतून घरोघरी सेवा देत असलेल्या महीलांच्या आरोग्याकरीता आयोजित या शिबीरामध्ये मेडीसीन, स्त्री रोग, अस्थीरोग , मधूमेह , रक्तदाब , हृदयरोग , पोटविकार , कान , नाक घसा , दंतशास्त्र, नेत्ररोग यासह सर्व प्रकारच्या आजारांची तपासणी करण्यात येवून प्रथमोपचार व औषध उपचार मोफत करण्यात आले.
सर्जरी विभागामार्फत स्तन कर्करोग जनजागृती मोहीमे अंतर्गत महीलांना स्तन कर्करोगा बाबत सविस्तर माहीती व समुपदेशन करण्यात आले.
डॉ. नितीन चाटे यांनी केले मार्गदर्शन
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत 8 मार्च पासून सुरु झालेल्या स्तन कर्करोग जनजागृती अभियानाची माहीती व लाभ या महीलांना व्हावा व त्यांच्या मार्फत अनेक घरात या मोहीमेची माहीती व्हावी या उद्देशाने शल्यचिकीत्साशास्त्र विभागाचे विभागप्रमुख व नोडल ऑफीसर डॉ.नितीन चाटे यांनी या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे व मान्यवरांची उपस्थिती
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230312-WA0063-1024x576.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230312-WA0063-1024x576.jpg)
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे हे होते तर मानवलोक संस्थेचे कार्यवाह मा. अनिकेत लोहीया, डॉ.खेडगीकर , आय एम ए चे अध्यक्ष डॉ नवनाथ घुगे , डॉ.ज्योती देशपांडे व सौ. कल्पना लोहिया यांची व्यासपिठावर ऊपस्थिती होती.
या प्रसंगी मानवलोक चे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आय एम ए अंबाजोगाई ही संघटना डॉ नवनाथ घुगे यांच्या अध्यक्षतेखाली करत असलेल्या अतिशय चांगल्या सामाजिक कामाबद्दल कौतुक केले.
विविध शासकीय योजनांची दिली माहिती
अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी महाराष्ट्र शासनाच्या वेग वेगळ्या शासकीय योजनांची सखोल माहिती दिली. तसेच या शिबिराच्या माध्यमातून करत असलेल्या सामाजिक सेवेबद्दल आय एम ए अंबाजोगाई चे अभिनंदन केले .
शिबीरामध्ये डॉ नवनाथ घुगे , डॉ नितीन चाटे , डॉ अनिल भुतडा , डॉ अरुना केंद्रे , डॉ सचिन पोतदार, डॉ.अतुल शिंदे, डॉ.राहुल डाके, डॉ.अर्चना थोरात, डॉ.अंजली रेड्डी, डॉ.स्नेहल होळंबे, डॉ.निलेश तोष्णीवाल, डॉ.विनोद जोशी , डॉ.राजश्री धाकडे , डॉ.श्रीकृष्ण नागरगोजे, डॉ.प्रशिक भगत, डॉ.रुपाली, डॉ.शामली , डॉ.शैलेश रेड्डी यांसह अनेक डॉक्टर्स सहभागी झाले होते.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230312-WA0066-1024x576.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230312-WA0066-1024x576.jpg)
डॉ. अरुणा केंद्रे यांनी केले संचालन तर प्रास्ताविक केले डॉ. नवनाथ घुगे यांनी
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230312-WA0064-1024x576.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230312-WA0064-1024x576.jpg)
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अरुणा केंद्रे यांनी तर प्रास्ताविक डॉ.नवनाथ घुगे यांनी केले. या प्रसंगी डॉ घुगे यांनी आय एम ए अंबाजोगाई च्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात या बद्दल माहिती दिली. सर्व डॉक्टर्स दररोज रुग्ण सेवा करत च असतात , परंतु अतिशय गरजू , धुनी भांडी करणाऱ्या , गरीब महिलांसाठी महिला दिनानिमित्त विशेष करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन केले आहे असे सांगितले . शिबिरामध्ये सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स तपासणी करून काही रुग्णाण्णा पुढील उपचारासाठी गरज असल्यास विशेष मदत करण्याचे सर्व डॉक्टर्स नि ठरविले आहे अशी माहिती दिली . यानंतर ही आय एम ए अंबाजोगाई च्या वतीने , वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या सहकार्याने भविष्यात असे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत अशी माहिती दिली .
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव डॉ.सचिन पोतदार यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता आय एम ए चे सर्व पदाधिकारी , सर्व सद्स्य, मानवलोक जनसहयोग चे शाम सरवदे,संजना आपेट,सावित्री सगरे तसेच दिलीप मारवाळ,कृष्णा यांनी परिश्रम घेतले.