गुप्त धन काढण्यासाठी मांत्रिकाची १६ वर्षीय कुमारी मुलीची बापाकडे मागणी
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/10/IMG_20231027_093357-1024x628.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/10/IMG_20231027_093357-1024x628.jpg)
बीड जिल्ह्यात मांत्रिका विरोधात अंमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
बीड जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुप्तधन काढण्यासाठी कन्याबळी देण्यासाठी मांत्रिकाने (भोंदु बाबा) चक्क बापाकडे केली 16 वर्षांच्या कुमारी मुलीची मागणी केली असल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सदरील मांत्रिका विरोधात अंमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुप्त धनासाठी 16 वर्षाची मुलगी द्या तिचा बळी देऊन गुप्त धन काढतो असं सांगणाऱ्या मांत्रिका (भोंदु बाबा) विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने खळबळ उडाली आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/10/IMG_20231027_093433-1024x572.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/10/IMG_20231027_093433-1024x572.jpg)
जिल्ह्यातील कोन या गावांतील दादाराव घोशिर या मांत्रिकाने (भोंदु बाबा) पुणे येथे असलेले गुप्तधन काढायचे आहे. त्यासाठी गावांतील भाऊसाहेब गरवकर यांना तुमची 16 वर्षाची मुलगी मला द्या, तिला सजवायचे आहे नटवायचे आहे आणि तिचा बळी द्यायचा आहे. मग गुप्तधन मिळेल, त्यातील काही धन तुम्हाला देतो असे आमिष दाखवले. तसेच ही गोष्ट कोणाला सांगितलं तर तुमच्या घरादाराला नष्ट करू अशी धमकी देखील या मांत्रिकाने दिली. त्यानंतर मुलीचेवडील भाऊसाहेब यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. त्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्यात दादाराव घोशिर (भोंदू बाबा) विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 129/2023 कलम 3 महाराष्ट्र नरबळी व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम 2013 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/10/IMG_20231027_093416-1024x903.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/10/IMG_20231027_093416-1024x903.jpg)
गुप्तधनासाठी कन्याबळी देण्याचा हा प्रकार तर नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोतन गावच्या गावकऱ्यांनी बैठक घेऊन या संदर्भात पोलीस प्रशासनाला देखील कळवले आहे मात्र या घटनेमुळे कोतन गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे.