गुजरात भाजपाध्यक्षाकडुन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कामाचे कौतुक


गुजरात मधील अधिवेशनाला सहकार्य करणार; खा. सी.आर.पटेल
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या दैनंदिनी आणि दिनदर्शिकेचे प्रकाशन गुजरात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सी.आर. पाटील, आमदार संगीता आर.पाटील आणि आमदार संदीपभाई देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरत येथे झाले. यावेळी पत्रकार संघाच्या सर्वदूर कामाचे कौतुक करुन राज्यस्तरीय अधिवेशन गुजरात येथे व्हावे यासाठी आपण पूर्ण सहकार्य करू अशी ग्वाही मान्यवरांनी दिली. पत्रकार संघाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष रविंद्र बी. पाटील, संपर्कप्रमुख रमजान मन्सुरी यांनीही अधिवेशन घेण्याचा मनोदय व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या दैनंदिनी(डायरी) आणि दिनदर्शिकेचे विमोचन सुरत येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सी.आर.पाटील यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी आमदार श्रीमती संगीता आर.पाटील, आमदार संदीपभाई देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी पत्रकार संघाच्या विविध उपक्रमांचे कौतुक करुन पाटील यांनी गुजरातमध्येही मोठ्या प्रमाणावर मराठी भाषिक पत्रकारांसह वेगवेगळ्या माध्यमात पत्रकार काम करतात.
या सर्वांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीकोणातून राज्यस्तरीय अधिवेशनाच्या इच्छेला पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तर पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, महासचिव डॉ. विश्वास आरोटे, प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, दिल्ली संपर्क प्रमुख रघुनाथ सोनवणे यांनी पत्रकार संघाच्या माध्यमातून कोविड काळात आणि इतर वेळी पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न अडचणीच्या काळात पत्रकारांना दिलेला मदतीचा हाथ याबाबत मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.
पत्रकार संघाचा विस्तार महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, दिल्ली या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. सर्व ठिकाणी संघाच्या पदाधिकार्यांनी आपल्या जनसंपर्क कामातून काम करणार्या पत्रकारांना आधार देण्याची भूमिका घेतली आहे. गुजरात संपर्क प्रमुख रमजान मन्सुरी, प्रदेश प्रमुख रविंद्र बी. पाटील, उपप्रमुख निरव मुंशी, महामंत्री श्री संजय मिसाळ, यांनी गुजरात मध्ये पत्रकार संघाचे भव्य अधिवेशन घेण्याचा मनोदय व्यक्त करुन त्यादृष्टीने प्रयत्न चालवले आहेत.
गोवा येथेही दिनदर्शिकेचे विमोचन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे गोवा संपर्क प्रमुख शिवाजी नेहे यांच्या पुढाकारातून समर्थ गडावरील श्री स्वामी मठाचे अध्यक्ष श्री जयश नाईक, मुख्य पुजारी श्रीकांत कुलकर्णी, विठ्ठल मंदिर पणजीचे अध्यक्ष संतोष भांजी यांच्या उपस्थितीत पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे पणजी येथील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.