“गीत लता दिदीचे स्वर अंबाजोगाईचे” ३ फेब्रुवारी रोजी विशेष कार्यक्रम!


वसुंधरा सेवा प्रतिष्ठान व मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता भारत रत्न लता मंगेशकर यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्य “गीत लता दिदींचे स्वर अंबाजोगाईचे” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमास शहरातील सर्व कलावंत व कला रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
वसुंधरा सेवा प्रतिष्ठानचे तालमार्तंड प्रकाश बोरगावकर व मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर यांच्या संकल्पनेने भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्य वसुंधरा सेवा प्रतिष्ठान व मराठी पत्रकार परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता नगर परिषद वाचनालय इमारती मधील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार कक्षात “गीत लता दिदींचे स्वर अंबाजोगाईचे” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वसुंधरा सेवा प्रतिष्ठान व मराठी पत्रकार परिषदेचा संयुक्त उपक्रम


या कार्यक्रमात स्थानिक गुणी कलावंत आपली हजेरी लावणार आहेत.
या कार्यक्रमास स्थानिक कलावंत व रसिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वसुंधरा सेवा प्रतिष्ठाचे नंदकिशोर मुंदडा, प्रकाश बोरगावकर, मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हा कार्यध्यक्ष दत्तात्रय अंबेकर, तालुका अध्यक्ष गजानन मुडेगावकर सचिव विरेंद्र गुप्ता यांनी केले आहे.