गायीच्या शेण पावडर पासून साकारले पर्यावरणपुरक गणपती; सिध्दी गोशाळेची वेगळी पायवाट!


बीडमधील सार्थक सिध्दी गाेशाळेचा आगळा वेळगा प्रयाेग;
घरातच विसर्जनासाठी उपयुक्त तसेच बागेसाठी हाेईल खतबीड शहरातील सार्थक सिध्दी गाेशाळेच्या संचालिका उमा औटे या मागील दहावर्षापासून गीर गायीची गाेशाळा चालवत आहेत. त्या स्वत: शिक्षीका हाेत्या. खासगी नाेकरीचा राजीनामा देऊन त्यांनी गाेशाळा सुरू केली. मागील दहा वर्षापुर्वी त्यांनी पाच गायीपासून सुरू केलेल्या गाेशाळेत सध्य स्थितीला लहान-माेठ्या ५३ गायी आहेत.यामध्ये गिर गाय तसेच गावरान गायीचा समावेश आहे.
काेराेनाच्या काळात घराच्या बाहेर पडता येत नव्हते. गणपती स्थापनेसाठी मुर्ती कशी आणायची असा प्रश्न हाेता. काेराेनाच्या पहिल्या वर्षात स्वत:च्या गाेशाळेमधील गायीच्या शेणापासून पावडर तयार केली. त्यात चिंचुके, उडीद, तांदुळ, डिंक, गवार गम या सर्वांची पावडर शेण पावडरमध्ये मिक्स करुन पर्यावरण गपणती साकारला स्वत:च्या घरासह जवळच्या नातेवाईकांना दिला. दुसऱ्या वर्षी ३५ गणपती साकारले व विक्री केली. यंदाच्यावर्षी तर ४०० गणपती साकरले आहेत. गणपती स्थापनेसाठी औरंगाबाद येथील हेडगेवार हाॅस्पीटलसह पुणे मिल्ट्री कॅम्पसाठी पर्यावरण पुरक गणपती पाठवण्यात आले आहेत. विसर्जनासाठी घरातच साेयीचा असून बागेसाठी खत म्हणून उपयाेगी ठरणारा आहे. काेराेनाच्या काळामधील बीडमधील सार्थक सिध्दी गाेशाळेचा शेण पावडर पासून गणपती हा आगळा वेळगा प्रयाेग अनेकांना कुतहूलाचा विषय ठरला आहे.
काेराेनामुळे लाॅकडाऊन हाेते. गणेश उत्सव साजरा कसा करायचा असा प्रश्न हाेता. औटे यांनी गाेशाळेमध्ये गायीचे शेण वाळलेले हाेते. ते बारीक करुन खडेमुक्त केले. घरामध्ये आटामशीन हाेती, त्यामध्ये वाळलेल्या शेणाचे तुकडे टाकून पावडर तयार केली. त्यात चिंचुके, उडीद, तांदुळ, डिंक, गवार यांची पावडर एकत्रीत करुन गणपती प्लास्टीक साचामध्ये टाकून तयार केला. पहिल्या वर्षी १० गणपती तयार केले. स्वत:च्या घरात गणपती स्थापना करुन पुजा केली. इतर गणपती मुर्ती नातेवाईकांना दिल्या. विसर्जनानंतर सर्वांचा अनुभव विचारात घेतला. सर्वांनी दर्जेदार गणपती झाला असे सुचवले. काेराेनाच्या दुसऱ्या वर्षी अशा प्रकारे ३५ गणपती साकारले. ते पर्यावरणपुरक गणपती म्हणून गाेशाळेमधून त्या मुर्तींची विक्री केली. यंदाच्या तिसऱ्या वर्षी उभा औटे यांनी ४०० शेण पावडरपासून पर्यावरण पुरक गणपती मुर्ती साकरल्या आहेत. त्याचे विक्रीमुल्य हे केवळ चारशे असे ठेवले आहे. गणपती तयार करण्यासाठी एक जाेडीला (पती-पत्नी) गाेशाळेमध्ये महिनाभरासाठी राेजगार उपलब्ध झाला.
औरंगाबाद, पुणे येथून मागणी
बीड शहरामधील सार्थक सिध्दी गाेशाळेमध्ये शेणापासून गणपती मुर्ती तयार केले जाते याची माहिती अनेकांना झाली. यंदाच्या वर्षी औरंगाबाद येथील हेडगेवार हाॅस्पीटल ( २० नग) आणि पुणे येथील पुणे मिल्ट्री कॅम्पमधून (१५ नग) गणपतीची मागणी झाली आहे. तसेच बीड शहरामधील डाॅक्टर व इतर व्यक्ती असे २० गणपती मुर्तीची विक्री झाली आहे. सार्थक सिध्दी गाेशाळा कार्यालय, शिंदे नगर, कॅनाॅल राेड बीड येथे संपर्क साधावा.
उमा औटे, संचालक, सार्थक सिध्दी गाेशाळा, बीड.
( 8830564081)