लातूरठळक बातम्या
गव्हाण येथे घाणीचे साम्राज्य डेंग्यू मलेरिया सारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता


रेणापूर प्रतिनिधी:- रेणापूर तालुक्यातील गव्हाण येथे घाणीचे प्रमाण वाढले आहे याकडे ग्रामपंचायत कार्यालय चे जाणुन बुजुन दुर्लक्ष करण्यात येत आहे. गावांमध्ये पावसाळ्या पुर्वीच्या काळात करावयाचे गटारी साफ करणे धुर फवारणी व इतर कोणतेही काम ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले नाही घाणी बद्दल गावातील नागरिकांनी अनेक तक्रारी करून सुद्धा सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य लक्ष देत नसल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.