ठळक बातम्या

कॉफी शॉप च.या गोंडस नावाखाली अश्लिल चाळे;दोन चालकांवर कार्यवाही

शहरात कॉफी शॉपच्या नावाखाली तरुणाईला अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची गुप्त माहिती अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांना मिळाली होती. त्यानंतर नेरकर यांनी मंगळवारी (दि.१३) सायंकाळी स्वतः तपासणी करत दोन कॉफी शॉपवर धडक कारवाई केली.
अंबाजोगाई शहर शैक्षणिक केंद्र असल्यामुळे आजबाजूच्या गावातून शिक्षणासाठी येणाऱ्या मुला-मुलींचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शहरात विद्यार्थ्यांना नजरेसमोर ठेऊन अनेक व्यवसाय उभे राहिले. त्यात मागील काही काळात शहरात कॉफी शॉपचे पेव फुटले. अनेक होतकरू तरुणांना यामुळे व्यवसायाची, रोजगाराची संधी उपलब्ध झाली. मात्र, काही कॉफी शॉप चालकांच्या लालसेने या व्यवसायात अनैतिकतेचा प्रवेश झाला. अशा व्यावसायिकांनी शाळा व महाविद्यालयांच्या रस्त्यांवर ‘कॉफी शॉप’ अशी गोंडस नावेमहाविद्यालयांच्या रस्त्यांवर ‘कॉफी शॉप’ अशी गोंडस नावे देऊन आतील भागात ‘खासगी कक्षां’ची निर्मिती केली आहे. येथे मिळणाऱ्या कॉफीचे दर म्हणजे किती वेळेसाठी ‘तो’ खासगी कक्ष आपणास पाहिजे त्यावर अवलंबून असतात. उपलब्ध सुविधांनुसार एका तासासाठी जवळपास दोनशे ते चारशे रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. अशा ठिकाणी बहुतेक शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थीनीच आढळतात, त्यातही अल्पवयीन विद्यार्थीनींचा समावेश अधिक असतो. अंबाजोगाई सारख्या सुसंस्कृत शहराच्या अशा कॉफी शॉपच्या माध्यमातून होणाऱ्या -हासाबद्दल सातत्याने ओरड होऊ लागली होती.

▪️अपर अधीक्षक कविता नेरकर
यांनी केली स्पॉट पाहणी
—————————-
दरम्यान, मागील महिन्यात गेवराई तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर बीड शहरातील एका कॉफी शॉपमध्ये बलात्कार केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर कॉफी शॉप मधून चालणाऱ्या अश्लीलतेचा मुद्दा ऐरणीवर आला. या पार्श्वभूमीवर अश्लीलतेचा अड्डा बनलेल्या काही कॉफी शॉपची माहिती अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांना मिळाली. होती. याचे गांभीर्य लक्षात घेत नेरकर यांनी मंगळवारी सायंकाळी स्वतः परळी रोडवर दीनदयाळ बँकेसमोरील ‘टॉम अँड जेरी’ आणि यशवंतराव चव्हाण चौकातील ‘कॅफे परफेक्ट’ या दोन कॉफी शॉपची स्पॉट तपासणी केली. या दोन्ही कॉफी शॉपमध्ये आतल्या बाजूस गुप्त केबिन केल्या होत्या. या ठिकाणी अल्पवयीन जोडपेही आढळून आले. याप्रकरणी श्रीकांत श्रीराम मुंडे, किरण विठ्ठल खाडे, ऋतुराज अरुण धायगुडे, श्रीकांत गोपाळ धायगुडे, सोमनाथबाळासाहेब पारवे या पाच जणांवर महाराष्ट्र पोलीस
अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली.

▪️कॉफी शॉप चालकांची बैठक
बोलावणार
——————
अंबाजोगाई सारख्या सुसंस्कृत शहराचे वातावरण बिघडू नये याची सर्वतोपरी काळजी घेण्यात येईल पालकांनीही आपला पाल्य कुठे जातो, काय करतो याकडे लक्ष ठेवावे. लवकरच शहरातील कॉफी शॉप चालकांची बैठक बोलावून त्यांना योग्य त्या सूचना करण्यात येतील.

• कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker