महाराष्ट्र
केदारेश्वर मंदिराच्या विकासासाठी पुरातत्व विभागाने पुन्हा दिला १ कोटी ४० लाखांचा निधी
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/10/IMG_20221016_062907.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/10/IMG_20221016_062907.jpg)
भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा बीड जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे धर्मापूरी येथील प्राचीन केदारेश्वर मंदिरातील मूर्तीशिल्पांवर रासायनिक प्रक्रिया करणे आणि संरक्षक भिंत बांधण्यासाठी पर्यटन खात्याने १ कोटी ८६ रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
पंकजा मुंडे यांनी केले विशेष प्रयत्न
अलिकडे या मंदिराचा गाभारा सुस्थितीत राहिला होता परंतु, सभामंडपाची बरीच पडझड झाली होती. मंडपाचे खांब व शिल्प असलेल्या शिळा मंदिर परिसरात अस्ताव्यस्त पडलेल्या अवस्थेत होत्या. सभामंडपाची पडझड रोखण्यासाठी व मंदिराचे जतन करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन दगडामातीत डागडुजी केली होती. असे असतानाच मंदिरास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी औरंगाबादच्या पुरातत्त्व विभागाने मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी दीड वर्षभरापूर्वी साडचार कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला होता. यात मातीत बुजलेल्या सभामंडपाचे उत्खनन करून विविध राज्यातून दगडी शिळा आणून वेगवेळ्या राज्यातील शिल्पकारांनी सभामंडपास पुर्व वैभव प्राप्त करून दिले आह
मंदिरात अनेक प्राचीन शिल्पं, मूर्त्या आहेत त्याचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने आता पुन्हा एकदा पंकजाताईंनी पर्यटन विभागाला सांगून १ कोटी ८६ लाख ४८ हजार रूपये मंजूर करून दिले आहेत. यातून राष्ट्रीय संरक्षित स्मारकाच्या मूर्ती शिल्पांवर रासायनिक प्रक्रिया करणे व संरक्षक भिंत बांधणे असे काम होणार आहे. या निधी खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून लवकरच हे काम सुरू होणार आहे. दरम्यान हा निधी मंजूर करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.
परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील केदारेश्वर (महादेव) मंदिर हे बीड जिल्ह्याचे शिल्पकलेचे वैभव आहे. बाराव्या शतकातील चालुक्यकालीन हेमडापंथी शैलीच्या मंदिराची पडझड झाली होती. पुरातत्व विभागाच्यावतीने साडेचार कोटी रुपये खर्चून पूर्वीच्या स्वरूपातील मंदिर साकारण्यात आले.
बाराव्या शतकातील मध्यवधी काळातील सहावा राजा विक्रमादित्य यांनी हे मंदिर बाराव्या शतकाच्या पुर्वार्धात बांधले असल्याची इतिहासात नोंद आहे. सुंदर व सुबक कोरीव काम करुन या केदारेश्वर मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. या मंदिराची शिल्प कला अतिशय उत्तम, कलात्मक आणि नाजुक असल्यामुळे ही शिल्पकला पाहण्यासाठी शिल्पकलेचे अभ्यासक, चित्रकार, भाविक, पर्यटक राज्यातील व देशातील विविध भागातून येथे येतात.
हे मंदिर अतिशय मनमोहक कलाकुसर केलेल्या दगडाच्या शिळावर उभारले आहे. मंदिर पश्चिम मुखी असून, उंच जागेवर बांधले आहे. पुर्व, दक्षिण, उत्तरेस देवकोष्ट असून, योगविष्णू, विदारण, नरसिंह शिल्प आहे. तर येथील किल्ला हा इतिहासाची साक्ष देणारा आहे.
◼️या मार्गावर आहे धर्मापुरी
——————————
अंबाजोगाई ते अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर आहे. बीड, परभणी, लातूर या जिल्ह्याच्या सीमेवर तर परळी वैजनाथ व अंबाजोगाई पासून २५ किलोमीटर तर गंगाखेड व अहमदपूरपासून ३५ किमी तर लातूर शहरापासून ४० किलोमीटर अंतरावर आहे.
मंदिरातील मुर्तीला होणार रासायनिक प्रक्रिया
धर्मापुरी येथील केदारेश्वर मंदिर अनेक आकर्षक सुंदर कलाकुसरीने घडवलेल्या प्राचीन मुर्ति आहेत. या सर्व मुर्त्यांवर रासायनिक प्रक्रिया करून या मुर्त्या मध्ये पुन्हा जिवंतपणा आणुन आकर्षक बनवण्यासाठी हा हा निधी वापरला जाणार आहे. शिवाय या निधीतुन केदारेश्वर मंदिर परीसराला संरक्षक भिंत ही बांधण्यात येणार आहे.