सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी विलास तरंगे यांची माहिती
२० नोव्हेंबर रोजी झालेल्या केज विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदार संघात ३ लाख ८७ हजार २२१ मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. यापैकी २ लाख ४५ हजार ७९९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. या मतदारसंघात मतदानाची टक्केवारी ही ६३.४८% एवढी झाली असल्याची माहिती केज चे तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा अंबाजोगाईचे विलास तरंगे यांनी दिली आहे.
केज विधानसभेच्या निवडणुकीसाठी केज मतदार संघातील ३ लाख ८७ हजार २२९ मतदार आपल्या मतदानाचा हक बजावून केज मतदारसंघाचा आमदार ठरवणार आहेत. निवडणूकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे.
३ लाख ८७ हजार २२१ मतदारांनी केली होती नोंदणी
केज विधानसभा मतदारसंघात एकुण ३ लाख ८७ हजार २२१ मतदारांची नोंदणी झाली होती. या मतदार संघामध्ये केज व अंबाजोगाई तसेच बीड तालुक्यातील नेकनूर व परिसरातील गावांचा समावेश आहे.
या मतदारसंघातील एकुण मतदारापैकी २ लाख २ हजार ६२० पुरुष मतदारापैकी १ लाख ३० हजार ८५९ मतदारांनी तर १ लाख ८४ हजार महिला या मतदारापैकी १ लाख १४ हजार ९४३ मतदारांनी तर ६ तृतीयपंथी उमेदवारापैकी २ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
२ लाख ४५ हजार ७९९ मतदारांनी बजावला मतदानाचा अधिकार!
या निवडणुकीत २५ उमेदवारांचे भविष्य मतदार संघातील ३ लाख ८७ हजार २२१ मतदारापैकी २ लाख ४५ हजार ७९९ मतदारांनी आपल्या मतदानातून २० नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीनमध्ये बंद केले आहे .
▪️५० वयोवृध्द व दिव्यांग मतदारांनी
केले मतदान
या निवडणुकीसाठी मतदार संघातील ५० वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांनी होम मतदान केले आहे. ज्या नागरिकांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे शक्य नसते. अशा मतदारांसाठी निवडणूक आयोगाने ही विशेष व्यवस्था निर्माण केली आहे. यामुळे त्यांना मतदानाचा हक्क बजावता येतो. होम वोटिंगची सोय मिळण्यासाठी अर्ज केलेल्या ५६ मतदारांपैकी २ मयत झाले. राहिलेल्या ५४ मतदारापैकी ३५ जेष्ठांनी तर १५ दिव्यांग अशा एकुण ५० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे यांनी सांगीतले.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.