केज विधानसभा मतदारसंघाचे चित्र ४ नोव्हेंबरला होणार स्पष्ट
४७ उमेदवारी अर्जांपैकी झाले ४ बाद
४३ उमेदवारांपैकी कोण राहणार रिंगणात हे होणार स्पष्ट
केज विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीचे चित्र उद्दा सोमवार ४ ऑक्टोबर रोजी स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीसाठी एकुण ४७ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. यापैकी चार उमेदवारांचे अर्ज छाननी दरम्यान त्रुटींमुळे अवैद्द ठरवण्यात आले होते. आता उर्वरित ४३ उमेदवारांपैकी कोण कोण या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे, हे ४ ऑक्टोबर रोजी निश्चित होणार आहे.
२०२४ च्या या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा जातीनिहाय जनगणना होणार असून मतदार संघाची पुनर्रचना करण्यात येणार आहे. या पुनर्रचनेत जिल्ह्यात आणखी एखाद्या नवा मतदार संघ तयार होईल आणि केज विधानसभा मतदारसंघ इतर प्रवर्गासाठी खुला होईल अशी समिकरणे या विभागातील राजकीय नेत्यांकडून वर्तवण्यात येत आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर केज विधानसभा मतदारसंघाच्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी एकुण ४७ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामधील सतिश काशीनाथराव पाटेकर, आसरत भगवान लोंढे, हिराबाई दिपक कांबळे आणि अनिल मसू डोंगरे या चार उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवले आहेत.
आता ४७ अर्जांपैकी ४३ उमेदवारांचे अर्ज शिल्लक आहेत. यामध्ये खालील 47 जणांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहेत.त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.
कोण कोण राहणार रिंगणात होणार स्पष्ट?
अंनत वैजनाथ गायकवाड,सतिश काशिनाथराव पाटेकर,पृथ्वीराज शिवाजी साठे,रमेश रघुनाथ गालफाडे,अनिल मसू डोंगरे,अशिष अशोक भालेराव, अशोक भागोजी थोरात, अशोक धोंडिबा सोनवणे,अशोक लक्ष्मण इचके,असरत भगवान लोंढे,जीवन श्रीपती गायकवाडे,काळुंके विकास रामभाऊ, साहस पंढरीनाथ आदोडे,शिरीष मिलिंदराव कांबळे, बालाजी मुकुंद ओठाळे,बळीराम शंकरराव सोनवणे,ज्ञानेश्वर लक्ष्मण कांबळे, काशिनाथ विश्वनाथ साबणे,लहू महादेव बनसोडे,मधुकर दगडू काळे,महावीर धर्मराज सोनवणे,मिलिंद दगडुबा आचार्य, राम धर्मराज जोगदंड, सचिन भिमराव चव्हाण, संजय बाबूराव होळकर, संजय पंढरीनाथ साळवे,सतीश विठ्ठल वाघमारे,शैलेंद्र सुदाम पोटभरे,शिंदे राहूल अंगद, सिद्धार्थ श्रीरंग शिनगारे, स्वप्नील बब्रूवाहन ओहाळ, वैभव विवेक स्वामी,विजयकुमार सुखदे वोहाळ, विशाल घनशाम घोबाळे, विशाल नवनाथ मस्के या ३५ पुरुषांचा तर नमिता अक्षय मुंदडा, अलका प्रभाकर साळुंके, शितल महादेव रोकडे, दिपाली भारत हंगे, हिराबाई दिपक कांबळे, मनिषा जाधव, जयश्री पृथ्वीराज साठे, जयश्री गोरख वाघमारे, संगिता विजयप्रकाश ठोंबरे, सपना सुभाष सुरवसे, सिता प्रदीप बनसोड या १२ महिला उमेदवारांचा समावेश आहे.