महाराष्ट्र

केज विधानसभा; आ. नमिता मुंदडा व पृथ्वीराज साठे यांच्या मध्ये सरळ लढत

१८ उमेदवारांची माघार तर २५ उमेदवार रिंगणात

केज विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून या निवडणुकीसाठी एकुण ४७ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. यापैकी चार उमेदवारांचे अर्ज छाननी दरम्यान त्रुटींमुळे अवैद्द ठरवण्यात आले होते. उर्वरित ४३ उमेदवारांपैकी १८ उमेदवारांनी आता माघार घेतली असल्यामुळे या निवडणुकीच्या रिंगणात २५ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. ही निवडणूक विद्यमान आ. सौ. नमिता अक्षय मुंदडा आणि माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या मध्ये सरळ लढतीचे संकेत देत आहे.

केज विधानसभा मतदारसंघ हा गेली चाळीस वर्षांपासून अनुसूचित प्रवर्गासाठी आरक्षित आहे. यावर्षी २० नोव्हेंबर रोजी होणारी विधानसभा निवडणुक ही अनुसूचित प्रवर्गातील उमेदवारांसाठी ची शेवटची निवडणूक असेल असा कयास बांधण्यात येतो आहे. त्यामुळे कदाचित आपले नशीब आजमवण्याची ही शेवटची संधी आहे हे गृहीत धरुन कधी नव्हे तो या निवडणुकीसाठी अनुसूचित प्रवर्गातील उमेदवारांनी सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल करणारी ही पहिलीच निवडणूक ठरणार आहे.
२०२४ च्या या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा जातीनिहाय जनगणना होणार असून मतदार संघाची पुनर्रचना करण्यात येणार आहे. या पुनर्रचनेत जिल्ह्यात आणखी एखाद्या नवा मतदार संघ तयार होईल आणि केज विधानसभा मतदारसंघ इतर प्रवर्गासाठी खुला होईल अशी समिकरणे या विभागातील राजकीय नेत्यांकडून वर्तवण्यात येत आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर केज विधानसभा मतदारसंघाच्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी एकुण ४७ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

यांचे अर्ज झाले अवैध!

यामधील सतिश काशीनाथराव पाटेकर, आसरत भगवान लोंढे, हिराबाई दिपक कांबळे आणि अनिल मसू डोंगरे या चार उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवले होते.
उर्वरित ४७ अर्जांपैकी ४३ उमेदवारांचे अर्ज शिल्लक आहेत. यापैकी आज उमेदवारी अर्ज वापस घेण्याच्या शेवटच्या दिवशी १८ उमेदवारांनी आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन रीतसर वापस घेतले आहेत

▪️यांनी दाखल केले होते अर्ज

अंनत वैजनाथ गायकवाड,सतिश काशिनाथराव पाटेकर,पृथ्वीराज शिवाजी साठे,रमेश रघुनाथ गालफाडे,अनिल मसू डोंगरे,अशिष अशोक भालेराव, अशोक भागोजी थोरात, अशोक धोंडिबा सोनवणे,अशोक लक्ष्मण इचके,असरत भगवान लोंढे,जीवन श्रीपती गायकवाडे,काळुंके विकास रामभाऊ, साहस पंढरीनाथ आदोडे,शिरीष मिलिंदराव कांबळे, बालाजी मुकुंद ओठाळे,बळीराम शंकरराव सोनवणे,ज्ञानेश्वर लक्ष्मण कांबळे, काशिनाथ विश्वनाथ साबणे,लहू महादेव बनसोडे,मधुकर दगडू काळे,महावीर धर्मराज सोनवणे,मिलिंद दगडुबा आचार्य, राम धर्मराज जोगदंड, सचिन भिमराव चव्हाण, संजय बाबूराव होळकर, संजय पंढरीनाथ साळवे,सतीश विठ्ठल वाघमारे,शैलेंद्र सुदाम पोटभरे,शिंदे राहूल अंगद, सिद्धार्थ श्रीरंग शिनगारे, स्वप्नील बब्रूवाहन ओहाळ, वैभव विवेक स्वामी,विजयकुमार सुखदे वोहाळ, विशाल घनशाम घोबाळे, विशाल नवनाथ मस्के या ३५ पुरुषांचा तर नमिता अक्षय मुंदडा, अलका प्रभाकर साळुंके, शितल महादेव रोकडे, दिपाली भारत हंगे, हिराबाई दिपक कांबळे, मनिषा जाधव, जयश्री पृथ्वीराज साठे, जयश्री गोरख वाघमारे, संगिता विजयप्रकाश ठोंबरे, सपना सुभाष सुरवसे, सिता प्रदीप बनसोड या १२ महिला उमेदवारांचा समावेश आहे.
या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना आपले ना उमेदवारी अर्ज वापस घ्यावयाचे आहेत त्यांच्या साठी ४ ऑक्टोबर ही तारीख निवडणूक आयोगाने निश्चित केली होती. या निवडणुकीत या ४३ उमेदवारांपैकी
१८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज आज रीतसर वापस घेतले.

▪️यांनी घेतली उमेदवारी वापस

जयश्री पृथ्वीराज साठे, ज्ञानेश्वर लक्ष्मण कांबळे, विशाल नवनाथ मस्के, विकास रामभाऊ काळुंके, प्रा. सौ. संगीता विजयप्रकाश ठोंबरे, सीता बनसोड, सिध्दार्थ शिनगारे या प्रमुख उमेदवारांसह इतर ११ उमेदवारांचा समावेश आहे.

▪️२५ उमेदवार रिंगणात

केज विधानसभेसाठी निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज वापस घेण्याची मुदत संपल्यानंतर या २५ उमेदवारांची उमेदवारी कायम राहिली आहे
1. अनंत वैजनाथ गायकवाड, बहुजन समाज पार्टी
2. नमिता अक्षय मुंदडा, भारतीय जनता पार्टी,
3. पृथ्वीराज शिवाजी साठे, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-
शरदचंद्र पवार 4. रमेश रघुनाथ गालफाडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना 5. अलका प्रभाकर साळुंके, टीपु सुलतान पार्टी 6. अशोक धोंडीबा सोनवणे, भारतीय युवा जन एकता पार्टी 7. अशोक भागोजी थोरात, बहुजन महा पार्टी
8. अशोक लक्ष्मण इचके, राष्ट्रीय मराठा पार्टी
9. जीवन श्रीपती गायकवाड, महाराष्ट्र स्वराज्य पार्टी. 10. शितल महादेव रोकडे, राष्ट्रीय समाज पक्ष
11. साहस पंढरीनाथ आदोडे, मराठवाडा मुक्ती मोर्चा
12. आशिष अशोक भालेराव, अपक्ष 13. जयश्री गोरख वाघमारे, अपक्ष 14. महाविर धर्मराज सोनवणे, अपक्ष
15. मीलींद दगडू आचार्य, अपक्ष 16 लहु महादेव बनसोडे अपक्ष 17. विजयकुमार सुखदे वाव्हळ, अपक्ष 18.विशाल घनशाम घोबाळे, अपक्ष 19. वैभव विवेक स्वामी, अपक्ष
20. शिरीष मिलिंदराव कांबळे, अपक्ष 21 सचिन भिमराव चव्हाण, अपक्ष 22 सतिष सुदाम पायाळ, अपक्ष. 23 संजय पंढरीनाथ साळवे, अपक्ष 24 संजय बाबुराव होळकर, अपक्ष आणि 25 स्वप्नील बब्रुवाहन ओव्हाळ
अपक्ष

▪️नमिता मुंदडा -पृथ्वीराज साठे

यांच्यात सरळ लढत

या निवडणुकीतील विद्यमान आ. नमिता मुंदडा आणि माजी आमदार पृथ्वीराज साठे यांचे मध्ये सरळ लढत होईल असे प्रथमदर्शनी दिसून येते आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker