केज मतदारसंघातील ३ कोटी रुपयांच्या विकास कामांचे २०फेब्रुवारी ला उद्घाटन


केज मतदारसंघातील अंबाजोगाई व केज तालुक्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अंतर्गत लिंक लाईन व ब्रेकर बसवणे च्या ३ कोटी रुपयांच्या कामांचा लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम २० फेब्रुवारी सोमवारी या मतदारसंघाच्या आ. नमिता मुंदडा यांच्या हस्ते व युवा नेते अक्षय मुंदडा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा व इतर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तरी या कार्यक्रमास त्या त्या विभागातील नागरीकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन स्थानिक संयोजकांनी केले आहे.
विद्युत अनुशेष दूर करण्यासाठी आ. मुंदडा यांचे विशेष प्रयत्न
केज विधानसभा मतदारसंघात या विभागाच्या लोकप्रतिनिधी आ. नमिता मुंदडा यांनी विविध विकास कामांचा झपाटा सुरु केला आहे. विकास कामासोबत गेली अनेक वर्षांपासून या मतदार संघाचा विद्युत सुविधा मधील अनुशेष भरुन काढण्यावर त्यांनी आपले विशेष लक्ष केंद्रित केले आहे.


आ. नमिता मुंदडा यांच्या हस्ते उद्घाटन तर नंदकिशोर मुंदडा, अक्षय यांची प्रमुख उपस्थिती
केज विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित विद्युत प्रश्नांचा बारकाईने अभ्यास करीत या विद्युत अडचणी शासकीय स्तरावरून अशा प्रकारे सोडवून घेता येतील यासाठी वारंवार वरीष्ठ अधिकारी यांचे सोबत बैठका घेवून प्रसंगी मंत्रालयात संबंधित कक्षात जावून या अडचणी सोडवण्यात त्यांना यश आले आहे.
३ कोटी रुपयांची विद्युत कामे होणार सुरु!
केज विधानसभा मतदारसंघातील विद्युत सुविधेतील येणारे अडथळे दुर करण्यासाठी आ. नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नामधुन सुरु करण्यात येणा-या मांडवा पठाण येथील 33 केव्ही उपकेंद्रातील नागझरी फिडर येथे 11 केव्ही उच्चदाब वाहिनी व 11 केव्ही ब्रेकर बसवणे हा कार्यक्रम मांडवा पठाण येथील 33 केव्ही उपकेंद्रावर सकाळी 08.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. सदरील कामावर अंदाजित किंमत 34.00 लक्ष रुपये रुपये खर्च अपेक्षित आहे.
या सोबतच चनई ते डोंगरपिंपळा 33 केव्ही उच्चदाब वाहिनी व 33 केव्ही ब्रेकर बसवणे. मौजे धावडी येथे
उच्चदाब वाहिनी व सोनवळा ब्रेकर बसवणे. चिचखंडी ते डोंगरपिंपळा 11 केव्ही उच्चदाब वाहिनी या कामांची सुरुवात डोंगरपिंपळा येथील 33 केव्ही उपकेंद्रावर सकाळी- 09.30 वाजता करण्यात येणार आहे. या कामाची अंदाजित किंमत 01 कोटी 22 लक्ष रुपये आहे.
डिघोळअंबा येथील 11 केव्ही उच्चदाब वाहिनीचे कामाचा प्रारंभ
डिघोळअंबा येथे सकाळी- 10.30 वाजता करण्यात येणार आहे. या कामावर अंदाजित किंमत 40.00 लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे.
त्या त्या विभागातील नागरीकांना उपस्थित राहण्याचे स्थानिक संयोजकांचे आवाहन


होळ ते दिपेवडगाव 11 केव्ही उच्चदाब वाहिनी कामाचा प्रारंभ दिपेवडगाव येथे करण्यात येणार आहे. या कामावर अंदाजित किंमत 40.00 लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे.
होळ येथील 33 केव्ही उपकेंद्रमध्ये ब्रेकर बसवणे या कामाचा प्रारंभ होळ येथील 33 केव्ही उपकेंद्र येथे
दुपारी- 04.30 वाजता होणार आहे. या कामावर अंदाजित किंमत 09.00 लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे.
युसुफवडगाव ते माळेगाव 33 केव्ही उच्चदाब वाहिनी या कामाचा प्रारंभ युसुफ वडगाव येथील 33 केव्ही उपकेंद्रावर सायंकाळी 05.30 वाजता करण्यात येणार आहे. या कामावर अंदाजित 84.00 लक्ष रुपये अपेक्षित आहे.
केज मतदार संघातील विद्दुत अनुशेष दुर करण्यासाठी ब-याचअंशी या कामाचा उपयोग होईल. या सर्व उद्घाटन व प्रारंभ कार्यक्रमास मतदार संघातील त्या त्या विभागातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वीज मंडळ व स्थानिक संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.