महाराष्ट्र
केज मतदारसंघाच्या विकासासाठी आ. नमिता मुंदडा यांना विजयी करा

केंद्रिय मंत्री ना. नितीन गडकरी यांचे आवाहन
योग्य उमेदवार निवडून दिला तरच विकासाचे दरवाजे उघडतात; तेंव्हा केज विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आ. नमिता मुंदडा यांनाच विजयी करा असे आवाहन केंद्रिय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी केले.
केज विधानसभा मतदारसंघातील भाजपा व मित्र पक्षाच्या युतीच्या उमेदवार आ. नमिता मुंदडा यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत केंद्रीय वाहतुक मंत्री ना. नितीन गडकरी बोलत होते. कार्यक्रमास भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आ.पंकजा मुंडे, माजी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या सह मित्र पक्षातील विविध पक्षांचे मान्यवर नेते गण उपस्थित होते.

बर्दापुर ते लोखंडी फाटा रस्त्याचे सहा महिन्यांत होणार चौपदीकरण
आपल्या विस्तारीत भाषणात ना. नितीन गडकरी पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणूक महाराष्ट्राचं भविष्य ठरविणारी असून या मतदार संघात नमिता अक्षय मुंदडा योग्य उमेदवार ज्यांना विकासाची दृष्टी आहे. मतदारांनी जागृत राहून आपलं भवितव्य घडविण्यासाठी मुंदडांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे. बर्दापुर ते लोखंडी फाटा अवघ्या सहा महिन्यात मी रस्ता मोठा करून देणार मी आश्वासन देणारा मंत्री नसून डंके के चोट पे काम करणारा असल्याचे ठणकावून सांगितले. नितीन गडकरी यांनी स्व.प्रमोदजी महाजन, स्व.गोपीनाथराव मुंडे, स्व.विमलताई मुंदडा यांच्या आठवणीला उजाळा दिला.
आ. पंकजा मुंडे यांनी महायुतीच्या उमेदवार आ. नमिता मुंदडा माझ्या हक्काची जागा असून केज मतदार संघ आमच्यावर प्रेम करणार आहे. राजकिय प्रतिष्ठा बनलेल्या या मतदार संघातून तुम्ही मुंदडांना प्रचंड मतांनी विजयी करा मी तुम्हाला हा मतदार संघ विकासासाठी दत्तक घेणार अशी घोषणा त्यांनी केली.

महाजन-मुंडे आणि विमलताई यांचे स्मरण तर कॉंग्रेसवर बोचरी टिका
केज विधानसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार सौ.नमिता अक्षय मुंदडा यांना विजयी करण्यासाठी येथील शंकर महाराज वंजारी वसतिगृह मैदानावर गडकरी मुंडेंची विराट जाहिर सभा संपन्न झाली. प्रारंभी स्व.महाजन, मुंडे, मुंदडा यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर उमेदवारांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या सभेत नितीन गडकरी यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच ही निवडणूक महाराष्ट्राचं भविष्य घडविणारी आणि जनतेचं भाग्य बदलणारी असल्याचे सांगितले. योग्य उमेदवार निवडून दिल्यानंतर सर्वांगिन विकास होतो हे सांगताना त्यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. त्यात ६० वर्षे काँग्रेस पक्षाने कारभार केला. गरीबी हटावचा नारा देताना कागदावर वीसकलमी कार्यक्रम राबविला. मात्र चेले चपाटे आणि प्रस्थापित भांडवलदाराची चाकरी करत चुकीचे आर्थिक धोरण आणि भ्रष्टाचाराने देश पोखरून ठेवला. आम्ही खोट नाट बोलून जनतेची दिशा भूल करत नाही. ईमानदारीने लोकांची सेवा करणे हा आमचा धर्म असून अवघ्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत कसा असतो हे समोर आले.

भ्रष्टाचार मुक्त कारभार हीच आमची ओळख
स्व.गोपीनाथराव मुंडे यांची आठवण काढताना तत्कालीन काळात त्यांनीच मला बांधकाम मंत्री पद दिल. ज्यामुळे मी राज्यात रस्ते विकास करू शकलो. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी असताना प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आम्ही आणली. ज्यातुन देशातील साडेतीन लाख ग्रामिण भागाची गावांचे रस्ते दुरूस्त झाले. सिंचन वाढले तरच शेतकर्यांचे उत्पन्न वाढेल. त्यासाठी अनेक नदीजोड प्रकल्प राबविले. सत्ता चालवताना राष्ट्रवाद, विकास, सुशासन, भ्रष्टाचार मुक्त कारभार आणि अंत्योदय हिच आमच्या कामाची पद्धत असल्याचे ते म्हणाले.
लोकसभेचे चित्र वेगळे
लोकसभा निवडणूकीत संविधान बदलणार असा विरोधकांनी निरेटव्ह प्रस्तापित केला. मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेल्या घटनेचे तत्व ज्याला कोणीही बदलू शकत नाही ते त्यांनी जाहिर सांगितले. संविधानाची कॉपी हातात घेवून डांगोरा पिटविणार्या काँग्रेस नेत्यांनीच खर्या अर्थाने संविधानाचा मोडतोड करून अनेकदा धोका पोहोचवला. अशी टीका त्यांनी राहूल गांधींचे नाव न घेता केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो. नमिता मुंदडा सुशिक्षीत उच्च विचारांच्या असून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.

अंबाजोगाई शहरांशी आपला वेगळा ऋणानुबंध; आ. पंकजा मुंडे
आपल्या भाषणात बोलताना आ. पंकजाताई मुंडे यांनी अंबाजोगाई शहराशी असलेला आपला ऋणानुबंध उल्लेखित करून स्व.सुनिल काका लोमटे यांची आठवण बोलताना काढली. बीड जिल्ह्यात १९८० पासून कमळाचे फुल राजकारणात फुलते, महाजन, मुंडे यांचा जिल्हा असून पुरोगामी जिल्ह्यात सामान्य जनतेचा विश्वास आमच्या नेतृत्वावर आहे. आम्ही विकास कसा करू शकतो. हे पालकमंत्री असताना दाखवून दिले. 2019 विधानसभा निवडणूकीत या मतदार संघात मीच नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली. दिल्याची आठवण करून देताना लोकांनी प्रचंड मतांनी मागच्या वेळी निवडून दिल. त्यांनी देखील जनतेची सेवा करत विकासाची महाचळवळ हाती घेतली. लोकसभा निवडणूकीत काही मतांनी जरी हरले असले तरी मनाने मी हरले नाही. विकासाचा सुर्य आम्ही कधीच जिल्ह्यात मावळू देणार नाही. जात-पात-पंत धर्म आम्ही माणूसकीचे राजकारण करतो. त्यामुळे माता योगेश्वरीचे आर्शिर्वाद कमळाचे बटन दाबून लोकसभेचा बदला घ्यावा असे ही त्यांनी सांगितले. कमळाच्या फुलावर लक्ष्मी असते. त्यामुळे विकासाला निधी कमी पडणार नाही.

मान द्या सन्मानाला कमी पडणार नाही
आपल्या भाषणात आ. पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, विधान परिषदेच्या निवडणूकीत आमदार नमिता मुंदडा यांनी मला मत दिलं. त्यामुळे आमदार झाले. त्यामुळे ही माझ्या हक्काची जागा असून मतदार संघातील तमाम जनतेने नमिता मुंदडा यांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले. लोकसभा निवडणूकीत झाले गेले ते विसरून जावे मला विजयाच्या माध्यमातून मान द्या मी तुमचा सन्मान वाढविल्या शिवाय राहणार नाही. हा मतदार संघ विकासासाठी दत्तक घेणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
२५ नोव्हेंबर लाख वैद्यनाथचा गाळप सुरु
ऊसाची चिंता करू नका येत्या २५ नोव्हेंबरला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना चालु होणार असल्याची गुड न्युज त्यांनी जाहिर सभेत शेतकर्यांना दिली. तेंव्हा प्रचंड टाळ्या वाजवून लोकांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेदवार सौ.नमिता अक्षय मुंदडा यांनी केले.


